राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
स्थानिक कुरखेडा येथील उप जिल्हा रुग्णालय येथे गरोदर महिला तालुक्याच्या ठिकाण असल्या मुळे बाळंतपणा करिता कोरची तहसिल व कुरखेडा तहसील च्या तसेच लगत च्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातून व ग्रामीण भागातून उपचारांसाठी येत असतात.
प्रत्येक उप जिल्हा रुग्णालयात “सुरक्षित मातृत्व आश्वाषण “फलक लावलेले आहेत.परंतू शोभेची वस्तू म्हणून फलक लागले असल्याचे आशिष काळे यांनी उप जिल्हा रुग्णालय कारभार पाहुन म्हटले आहे.
स्थानिक नगर सेवक यांनी माहिती घेतली असता स्त्री व प्रसूती वैद्यकिय अधिकारी ह्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमकरीता मुंबई येथे निघुन गेलेले आहेत.त्यांचे जाण्यामुळे साधारण अथवा अतिशय गंभीर परिस्थीतीत महिला रूग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला, तर त्याला एक तर प्रसूती समयी जिल्हा रुग्णालयात प्रसूती करिता पाठविले जाते आहे किंवा खासगी रुग्णालयात उपचार करिता जावे लागते आहे.
अश्या वेळी एखाद्या महिला रुग्णाची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाल्याचे प्रकार घडलेला आहे तेंव्हा सुरक्षित मातृत्व आश्वाषण या फलकाकडे लक्ष वेधून जाते की कुठे आहे गरोदर मातेची सुरक्षितता,कुठे आहे नवजात बाळाची सुरक्षितता,कुठे आहे सुरक्षित मातृत्व?
करिता या बाबी लक्षात घेऊन त्वरीत वरिष्ट स्तरीय अधिकार्यानी,आरोग्यसेवा पुरविणारया प्रशासन यंत्रणेने दखल घेवुन कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्री व प्रसूती वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करावी व आठवड्यातील सातही दिवस रुग्णालयात गरोदर स्त्रियांना उपचार मिळेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.