दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर सोशल मिडियाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयातील १९८८-८९ मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरू जनांचा कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि.२३) रोजी आळंदी येथील अगस्ती हाॅल या ठिकाणी शाळेबद्दल गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करून जुन्या आठवणीना उजळा दिला.
यावेळी शाळेतील सेवानिवृत्त आणि तत्कालीन शिक्षक, यांना फेटा बांधून औक्षण करत शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
मुलीनी पुर्वीचे नाव सासरचे नाव अशी ओळख परेड झाली प्रत्येकाने आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कार्यक्षेत्र सांगितले. शेतीपासून ते वकिल, सीए, पत्रकार, इंजिनियर, उद्योजक, शिक्षण, प्रशासन, उद्योग, सेवा, कला, संस्कृती, नोकरदार, विविध आदी क्षेत्रांत आदी क्षेत्रांत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेल्या उच्चपदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थीनी आपले अनुभव कथन केले. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे उपस्थित शिक्षक विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करून अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला.अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; परत एकदा सुमारे १०० हुन अधिक विद्यार्थी एकत्र आल्याने सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.
प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता अनेक जन जुन्या आठवणीत हरवून गेले होते. तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील,अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने तत्कालीन शिक्षक प्रमोद मंजुळे, गोविंद यादव, नानासाहेब साठे, हमीद शेख, छाया गायकवाड, दिपक मुंगसे, सरला जोशी, वृषाली पारख उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक शिल्पकला रंधवे यांनी केले. सुत्रसंचालन जनार्दन सोनवणे यांनी केले. तर आभार शंकर जाचक यांनी मानले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गिलबिले, पुणे मनपा शिक्षण संचालिका शिल्पकला रंधवे, उद्योजक जनार्दन सोनवणे, मनोज कुऱ्हाडे, पत्रकार अर्जुन मेदनकर, संजय कडदेकर, शिवाजी भोसले, कांचन उकीरडे, लीला थोरवे, मनिषा पिंपरकर, सुधीर कुऱ्हाडे, संतोष ठाकूर तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.