राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली आणि अहेरी बस आगारातील एस टी बसेस फार वर्षा पासून चालत असल्याने जुन्या व भंगार झालेल्या आहेत. वारंवार रोजच एस टी बसेस रस्त्यात फेल होऊन उभ्या असतात रस्त्यावर जंगलात बस फेल झाल्याने महिला म्हातारे व इतर प्रवाशांना फारच व सोबत ड्रायव्हर कंडक्टरला ही नाहक त्रास सहन करावं लागत आहे.
एस टी अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही नवीन बस ची मागणीचा प्रस्ताव अनेकदा पाठविला पण नवीन बस उपलब्ध होत नाही.आज १३/१/२०२४ ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान अहेरी आगारातील बस कुरूड (वडसा) फाट्यावर प्रवाशी ने भरून उभी होती, विचार पुस केले असता फेल झाल्याचे सांगितले.
याच बस मध्ये प्रवास करीत असलेला एका प्रवाशाने सांगितले हीच बस अहेरी वरून येत असताना आष्टी तही फेल म्हणजे एका दिवसात दोनदा फेल होणे म्हणजे बस पूर्णत भंगार झाली आहे तेच हाल गडचिरोली आगारातील बसची आहे. रोजच दोन तीन रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकानी बस फेल होऊन उभी दिसते या पूर्वी अहेरी डेपोची बस तर पावसाळ्यात वरचा पल्ला निघाल्याने प्रवाशी भिजत भिजत प्रवास केला अहेरी आगारातील बसेस सुद्धा अनेक ठिकाणी फेल होऊन उभे असतात.
या जिल्हातील पालकमंत्री सन्माननीय ना. देवेंद्र जी फडवणीस असताना सुद्धा या जील्हाच्या विकासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्रात महाराष्ट्रात सत्ता आहे. एका चुटकीने ना.देवेंद्र फडवणीस नव्या बसेस गडचिरोली जिल्हातील दोन्ही डेपोत उपलब्ध करून देऊ शकतात.पण ना.देवेंद्र फडवणीस बस उपलब्ध करून देण्यासाठी का दुर्लक्ष करीत आहेत हेच समजत नाही.
बसेस मध्ये महिला म्हातारे विद्यार्थी आणि विविध ऑफिसियल कामा साठी लोक प्रवास करीत असतात त्यामुळे याना फार त्रास सहन करावा लागतो. तरी विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक एस टी आगार गडचिरोली आणि अहेरी यांनी शासनास नव्या एस टी बसेस मागणीसाठी अती तत्काळ पाऊल उचलावे.
एस टी महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना जील्हातील पालक मंत्री परिवहन मंत्री यांची भेट घेऊन नवीन बसेस त्वरित उपलब्ध करून घ्यावे. एका महिन्यात एस टी बस उपलब्ध न झाल्यास गडचिरोली आणि अहेरी आगरास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल (आरमोरी विधान सभा)तथा विभागीय अध्यक्ष एस टी कामगार सेना ( ऊ बा ठाकरे) यांनी दिला आहे.