राकेश चव्हाण
करखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा येथे शासनाने रुग्णांना उपचार त्वरित मिळावे म्हणून सन 2001पासुन उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली. सध्या कार्यरत वैद्यकिय अधिक्षक बाहेर गावुन येणे जाणे करतात. कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थीत राहणे आवश्यक असते परंतु त्यांना जाब विचारणारे वरिष्ठ अधिकारी येथे नसल्याने केव्हा ही याव केव्हा ही जावं असा प्रकार सुरु आहे,त्यामूळे अनेक गरजू रुग्णांची शासकीय कामे रखडून असतात,त्याना कोण विचारणार सवाल उपस्थित होते आहे.
माहिती घेतल्यास वरिष्ठ कार्यालयात मिटींग ला गेले असे सांगतात.त्यांचे अनुपस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिक दखल न्यूजभारत चे तालुका प्रतिनिधी यांना आला.अत्यंत गरजेचे जन्म म्रुत्यु प्रमाण पत्र येथे नोंदविले जाते.त्यावर स्वाक्षरी अधिक्षकाची आवश्यकता असते मग देणार कोण!अतिशय संवेदनशील क्षेत्र आरोग्यसेवा ही असुन वरिष्ठ अधिकारी च असे अनुपस्थित राहतील तर अधिनस्त कर्मचारी कसे उपस्थीत राहतील असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्हातील वरिष्ठ अधिकारी यांनी या लेटलतिफी कडे लक्ष देणे आवश्यक आहे.ज्यामुळे रुग्णांना तत्परतेने सेवा ऊपलब्ध होईल.