राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत झालेल्या गैर व्यवहारामुळे ठेवीदारांचे व खातेदारांचे रुपये मिळेनात? — खातेदार व ठेवीदार यांची स्वनिर्मित अन्याय निवारण समिती करणार साखळी व आमरण उपोषण… — गैरव्यवहार शोधून काढा व आमचे रुपये द्या!,”ही असणार मुख्य मागणी,…

 

   दखल न्यूज भारत

       विशेष न्यूज 

          चाचणी आॅडीट अन्वये राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे तर सन २०२० च्या आॅडीट नुसार संस्था मुनाफ्यात होती असेही सांगितले जात आहे.

         मात्र,पतसंस्था अंतर्गत गैरव्यवहार झाला नाही असे गृहीत धरले तर ठेवीदारांचे व खातेदारांचे रुपये देण्यास अळचण नव्हती हे मान्य करायलाच पाहिजे. 

        राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार किंवा झालेला योग्य आर्थिक व्यवहार हा ठेवीदारांना व खातेदारांना अळचणीत आणणारा ठरला आहे.

         दैनंदिन रोख रक्कमे अन्वये पतसंस्थेत विश्वासाने जमा केलेले रुपये वारंवार पायपीट केल्यानंतर सुध्दा मिळत नसल्यामुळे खातेदार व ठेवीदार परेशान झाले असून वैतागले आहेत.तद्वतच पतसंस्थेचा ढिसाळ व अयोग्य आर्थिक व्यवहार हा खातेदारांच्या आणि ठेवीदारांच्या लक्षात आला आहे.

           आर्थिक गैरव्यवहार कुणी केला याचा चौकशी अंती शोध घ्यावा व आमचे रुपये मिळवून देण्यासाठी संबंधित चौकशी विभागांनी मदत करावी असी मागणी ठेवीदारांची व खातेदारांची आहे.

             राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावर पतसंस्था रजिस्टर झाली असल्याने त्यांचे नाव पतसंस्थेच्या संबंधितांनी गैरव्यवहारातंर्गत खराब करु नये असे सुध्दा ठेवीदारांचे व खातेदारांचे म्हणणे आहे.

            दैनंदिन ठेवीचे व खात्यात जमा ठेवलेल्या खातेदारांचे रुपये पतसंस्थेच्या संबंधितांनी द्यावे व ज्यांनी पतसंस्था अंतर्गत गैरव्यवहार केला आहे अशांचा चौकशी अन्वये शोध घ्यावा,यासाठी,”अन्याय निवारण समिती,”साखळी उपोषण व आमरण उपोषण,करणार असल्याचे त्यांनी सुतोवाच सोडले आहे.तद्वतच उपोषणा संबधाने ते पत्रव्यवहार प्रशासकीय यंत्रणेला करणार आहेत.

       खातेदारांचे व ठेवीदारांचे साखळी उपोषण व आमरण उपोषण कदाचित चिमूर नगरपरिषद निवडणूकीचे आणि चिमूर विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलवणारे ठरु शकते.