कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी::- वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,व पक्षप्रमुख श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन,रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ४ जानेवारीला रामटेक विधानसभा क्षेत्रातंर्गत पारशिवनी तालुक्यातील मौजा चारगाव येथील नागरिकांनी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात जाहीर प्रवेश केला .
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे.
रामटेक विधानसभेत कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे.
त्याच रामटेक विधानसभेत शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षावर विश्वास ठेवून सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, रामटेक विधानसभा मधील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासित करून या सर्वांचे भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सर्वश्री फुलचंद तुप्पट,कैलास बेद्रे,रामदास गजभिये,चेतन राऊत,शुभम पाटील,अभी माहिम,सुनील पारधी,प्रकाश ठाकूर,अमित ढोरे,राहुल धुर्वे,राजपाल शेंद्रे,वासुदेव शिवणकर,सौ.सुरेखाताई बेद्रे,सौ.निर्मलाताई बघमारे,सौ.रेशमाताई देसाई,सौ.दुर्गाताई सोनबरसे,सौ.निर्मलाताई गजभिये इत्यादिं महिलाचा पक्ष प्रवेश करण्यात आला..
याप्रसंगी रामटेक विधानसभा मधिल शिवसेना(उ.बा.ठा.) विधानसभा संघटक श्री. रमेश तांदूळकर, तालुका प्रमुख पारशिवनी श्री.कैलास खंडार, तालुका प्रमुख रामटेक श्री.हेमराज चोखांद्रे,जिल्हा प्रमुख कामगार सेना श्री.समीर मेसराम, पारशिवनी तालुका सचिव श्री.संजय देसाई,करंभाड विभाग प्रमुख श्री.प्रशांत लकडकर सह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.