रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
पोलीस विभागाच्या स्थापना दिवसानिमित्त पोलीस विभाग व सामान्य जनतेत समन्वयका करिता जनजागृती सप्ताह राबविले जात आहे.
या अंतर्गत शाळा महाविद्यालयात वाहतुकीचे नियम,अपघात,प्रतिबंधक उपाय,सायबर,गुन्हे, अंधश्रद्धा,जनजागृती पोलीस विभागामार्फत केल्या जात आहे.
चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 5 जानेवारी शुक्रवारला संत श्री.भय्यूजी महाराज विद्यालयाच्या सहकार्याने चिमूर शहरातील मुख्य मार्गाने पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात जनजागृती रॅली काढण्यात आली.
ही रॅली चिमूर पोलीस स्टेशन पासून हजारे पेट्रोल पंप ते हुतात्मा स्मारक येथे जाऊन याच मार्गाने परत आली.या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या घोषणा दिल्या. रॅलीचे समारोप संत श्री भय्यूजी महाराज महाविद्यालयात करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम,अपघात प्रतिबंधक उपाय तसेच पोलीस प्रशासनाचे कार्यपद्धती विषयी पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते यांनीसविस्तर माहिती दिली.या उपक्रमात पोलीस कर्मचारी,श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयाचे शिक्षक वृंद तथा संपूर्ण विद्यार्थी सहभागी झाले होते.