भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे ” सावित्रीबाई फुले “यांची जयंती बालिक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात गावातून रँली काढून करण्यात आली.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत वर्ग 8 वी तील सूहास पदा व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत वर्ग 8 वी तील कु.दिक्षा उसेंडी,कु.स्वाती उसेंडी, कु.तृप्ती उसेंडी, कु.आरती मडावी,कु.संध्या धुर्वे. वर्ग 9वी तील कु.मेघा हलामी व वर्ग 10 वी तील कु.भारती धुर्वे,कु.वैष्णवी गावडे,कु.ललीता उसेंडी,कु.कशिष दुगा,कु.श्वेता पोटावी यांनी पार पाडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एन.बढई मुख्यध्यापक यांनी भुषविले.अध्यक्ष महोदयांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून दिप प्रज्वलित केले. सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
यावेळी प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका कु.ए.बी.शेख तर संचालन सारीका गावडे वर्ग 9 वी यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर भाषन सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एल.डब्ल्यू. धुडसे, सी.डी.गदेवार एस.पी.मारकवार ,जि.एन.ठमके ए.एस.संतोषवार.यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिक्षांत करंगामी वर्ग 8 वी यांनी केले. तसेच कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.