दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
नागभीड तालुका काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाला भेट देत महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले हा कायदा रद्द करण्यासाठी चालक-मालक संघटना यांच्या सोबत आहे.
केंद्र सरकारने घेतलेले नवीन विधेयक नुसार अपघातातील वाहन-चालक,वाहन सोडून पळून गेल्यास वाहन चालकास १० लाख रु. दंड व १० वर्षाची शिक्षा नवीन कायद्यात केलेली आहे.
सदर कायद्यांतर्गत साधारण कुटुंबातील ड्रायव्हरला १० लाख रू. दंड तसेच दहा वर्षाची शिक्षा परवडणारे नाही.यामुळे या कायद्यात दुरुस्ती करावे.यासाठी ड्रायव्हर संघटना तळोधीच्या वतीने महाराष्ट्र विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ना.विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले कि ७० वर्ष काँग्रेसची सत्ता असताना असे कायदे आणले नाही,हे असे कायदे रद्द करण्यास आम्ही बीजेपी सरकारला धारेवर धरू.आपल्याला गालबोट लागेल असे आपण कायदे हातात घेऊ नये,असे आश्वासन दिले व आमचा ड्रायव्हर संघटनेला पाठीबा आहे असेही सांगितले.
यावेळी नागभीड तालुका कांग्रेस अध्यक्ष प्रमोदजी चौधरी,विधानसभा काँग्रेस संयोजक विनोदभाऊ बोरकर, नागभीड कांग्रेस सचिव शरदजी सोनवाने,काँगेस कार्याध्यक्ष गणेशजी गड्डमवार,तळोधी युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम छूकारिया,अमोलभाऊ बावणकर, बाळू मदणकर, इरफान पठाण, इस्राएल शेख, होमदेव आत्राम, वेणूदास खोब्रागडे, रवी शेंडे, सुनील शेंडे,मधुकर गेडाम, व इतर उपस्थित होते.