प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील इंदिरागांधी चौक माच्छिपालन सहकारी संस्थेसमोरील समाज मंदिराजवळील हातपंप अनेक दिवसापासून हातपंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हातपंप तत्काळ दुरुस्त करा अन्यथा ग्रामपंचायतीवर घागरा मोर्चा काढण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. गावात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. अशात येथील ग्रामपंचायतने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस आळ पाणी नळाद्वारे सोडत आहे. दोन ते तीन दिवस आळ मिळणारा नळाचा पाणी शासकीय नळावर मिळत नसल्याने नागरिकांना हातपंपच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. ऐन पाण्याच्या अडचणीत मच्छिपालन संस्थे जवळील हातपंप नादुरुस्त झाल्याने तेथील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.
इंदिरागांधी चौक माच्छिपालन सहकारी संस्थेसमोरील समाज मंदिराजवळील हातपंपचे चैन तुटल्याने हातपंप नादुरुस्त झाले आहे. पाणी मिळण्यासाठी हातपंप जवळ असलेल्या प्रवीण कांबळे चैनला तार लाऊन कसेबसे पाणी काढत असते. परंतु हे पाणी मोजके मिळत असून ग्रामपंचायतीने हातपंपचे नवीन चैन लावावे आणि नादुरुस्त हातपंप तत्काळ पूर्ववत दुरुस्त करण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायतीवर घागरा मोर्चा काढण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.