उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
आजाराला कंटाळून ६५ वर्षीय इसमाने स्वतःच्या शेतातील बाबरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी राळेगाव शेत-शिवारात घडली. महादेव तानबा खिरटकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
मृतक महादेव तानबा खिरटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान त्यांना आजाराचा त्रास वाढल्यामुळे ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. दरम्यान, त्यांनी राळेगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव तानबा खिरटकर हे वेकोलिचे सेवानिवृत्त कामगार असून पाटाळा येथे आपल्या घरी कुटुंबियांसह राहत होते. ते नेहमी सकाळी फिरायला जायचे. मात्र ते बराच वेळ घरी वापस आले नाही. दरम्यान गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा सतीश महादेव खिरटकर हा नेहमीप्रमाणे राळेगाव येथील आपल्या शेतात गेला. दरम्यान शेतातील बाबरीच्या झाडाला एक इसम गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. सतीश जवळ जावून बघितला असता त्याचे वडिलच घळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान सतीशने आपल्या आई, काका व नातेवाईक यांना फोन करून माहिती दिली. आणि माजरी पोलिस ठाणे गाठून रिपोर्ट दिली.
मृतकाचा मुलगा सतीश खिरटकर यांच्या रिपोर्टवरून माजरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहवा बंडू मोहुर्ले , पोशि रविंद्र गीते यांनी घटनेचा प्राथमिक तपास करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविले. पुढील तपास ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात पोहवा बंडू मोहुर्ले हे करीत आहे.