उमेश कांबळे ता प्र भद्रावती:
काही दिवसापूर्वि तालुक्यातील मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्थेच्या एका सभासदाचा मासेमारी दरम्यान तलावात बुडून मृत्यू झाला.
त्यात संस्थेने एकही सभासदांचा जीवन विमा काढलेला नाही. त्यामुळे या मृतक सभासदाचे कुटुंब आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहे. संस्थेच्या या अक्षम्य चुकीची सजा त्याचे कुटुंबीयांना का?असा संतप्त सवाल संस्थेचे इतर सभासद करीत आहे.
दिनांक 11 एप्रिलला घोडपेठ तलावात आपल्या सहकार्यासोबत मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय अंकुश रमेश नागपुरे रबरी ट्यूबच्या बोटीवरून तोल गेल्याने बुडून मरण पावला. त्याच्या घरची आर्थिक स्थिती हलाकीची आहे.
वास्तविक पाहता संस्थेने मच्छीमारी करणाऱ्या सर्व सभासदांचा जीवन विमा काढणे आवश्यक आहे. मच्छीमारीचे काम धोक्याचे आहे परंतु याकडे विद्यमान संचालक मंडळाने अक्षम्य दुर्लक्ष केले सन १९५० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने कठोर परिश्रम करून हळूहळू आपली आर्थिक प्रगती मजबूत केली परंतु सन २०१६ मध्ये सत्तेवर आलेल्या संचालक मंडळांनी अनेक चुकीचे निर्णय घेऊन ही संस्था डबघाईस आणली.
त्याचा फटका आज मच्छीमारी करणाऱ्या सभासदांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे.
संस्थेचे सचिव संभाजी मांढरे यांना विचारणा केली असता संस्थेने मच्छीमारी करणाऱ्या सभासदांचा जीवन विमा न काढल्याने आम्ही आर्थिक मदत करू शकत नाहीअसे सांगितले.