बिटोली येथील त्रिनीटी प्रार्थना भवन मध्ये दोन दिवसीय नाताळ सण उत्साहात साजरा..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

            पारशिवनी- ख्रिसमस,नाताळ सण येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो.पाराशिवनी तालुकात एकुण सात चर्च प्रार्थना भवन असून यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. 

             पारशिवनी तालुकातंर्गत तील पारशिवनी शहरात व ग्रामिण भागातील बिटोली येथे दोन दिवसिय त्रिनिटी प्रार्थना भवन चर्च मध्ये केक कापुन प्रार्थना मनोज खडसे,रामदास भोडेकर यानी केली.

          या प्रसंगी प्रामुख्याने बिटोली गावातील पोलीस पाटील सिमा कळमकरच्या हस्ते केक कापण्यात आले.याचबरोबर त्रिनिटी प्रार्थना भवन चर्च मध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्म सोहळा आज दुसरे दिवसी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

             प्रभू येशू ख्रिस्त यांची बालरुपी मूर्ती ठेवीत जन्म झाल्याची परंपरागत आख्यायिका मान्य करीत ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणानिमित्य एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

               नाताळनिमित्त पारशिवनी व बिटोली गावातील प्रार्थना भवन चर्च मध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे.भवनावर अनेकांनी सांताक्लोजची वेशभूषा केली होती.