प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
उद्या मनुस्मृती दहन दिवस व स्त्री मुक्ती दिवस आहे.या दिनाचे औचित्य साधून,”नागपूरच्या बहुजन वंचित आघाडीने,”स्त्री मुक्ती दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले आहे.सदर दिनानिमित्ताच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.अर्थात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने अँड.प्रकाश आंबेडकरांची चौफेर तोफ २५ डिसेंबरला धडधडणार आहे.
युगपुरुष,युगप्रवर्तक, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सामुहीकपणे मनुस्मृतीचे दहन केले.त्यानंतर भारतातील सर्व स्त्रियांना आणि बहुजन समाज घटकातील सर्व नागरिकांना,”जगमान्य थोर समाजसुधारक ठरलेल्या कायदेतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले.तेव्हापासून २५ डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती चळवळीच्या संबंधाने अत्यंत महत्त्वाचा दिवस भारत देशात मानला जातो आहे.
यामुळेच नागपूर येथील रिझर्व्ह बँक जवळील मैदानावर उद्या म्हणजे २५ डिसेंबर २०२३ रोज सोमवारला वंचित बहुजन आघाडीची अभूतपूर्व सभा स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने होऊ घातलेली आहे.
या सभेची जय्यत तयारी नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.
या स्त्री मुक्ती दिनाच्या शोहळ्याला अख्या देशातून स्त्रिया व पुरुष येणार असल्याचे संकेत आहेत.मात्र विदर्भातंर्गत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्त्री मुक्ती दिनाला यशस्वी करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर हे उद्याच्या म्हणजे २५ डिसेंबरला होऊ घातलेल्या नागपूरच्या,”स्त्री मुक्ती दिनाच्या महामेळाव्याला, उपस्थित राहणार आहेत व महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
यामुळे नागपूर येथे होणाऱ्या सदर स्त्री मुक्ती महामेळाव्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.
बोधिसत्व तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व स्त्रियांना व बहुजन समाजातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक समाज घटकातील नागरिकांना व इतर समाज बांधवांना,”मनुस्मृती अन्वये जहाल-जुल्मी कायद्याच्या जोखडातून मुक्त केले व भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अधिकार बहाल केले,मानुस म्हणून जगण्याची सर्वांना संधी दिली,राज्यकर्ते-अधिकारी-कर्मचारी व व्यवसायीक बनण्याचे सर्वांसाठी मार्ग खुले केले.
म्हणूनच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील सर्व स्त्रियांवर व पुरुषांवर न फेडणारे अनंत उपकार आहेत.