अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रत्यक्षात भगवंत उभा असतो म्हणूनच यासाठी नामाचा रस घ्यावा… — ह भ प सुरेश महाराज सूळ अकलूज किर्तन सेवे प्रसंगी बोलत होते… — अखंड हरिनाम सप्ताह निमित्त चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प सुरेश महाराज सूळ न्यानाई गुरुकुल अकलूज यांची झाली…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            चालू असलेला अखंड हरिनाम सप्तह पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्त ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्ग दर्शनाने व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प सुरेश महाराज अकलूज यांची झाली. तर त्याच दिवशी संध्याकाळी भोजन व्यवस्था,अन्नदाते नामदेव नारायण बोडके व सुदर्शन रघुनाथ बोडके,यांच्या वतीने देण्यात आली. 

              तसेच संपूर्ण सप्ताहासाठी आठ दिवस सकाळी चहाची व्यवस्था आबासाहेब गजानन बोडके यांच्या वतीने देण्यात येत आहे.तर दररोज सकाळी आठ दिवस अल्पोआहारची व्यवस्था शरद विठ्ठल बोडके यांची असते. आठ दिवस फुल आणि हार व्यवस्था नबेलाल शाबुधीन शेख यांची असते. आठ दिवस शुद्ध पाणी व्यवस्था तेजस एक्वा यांची असते. मंडप स्पीकर व्यवस्था विठ्ठल साऊंड सर्विस गणेशवाडी विठ्ठल गायकवाड यांची आहे.सप्ताहासाठी संपूर्ण आचारी सेवा ह भ प शिंदे बुवा बिजवडी यांची चालु आहे.

           हरिजागर व नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहाची तिसऱ्या दिवसाची सेवा झाली. सप्ताहासाठी, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आजी, माजी ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने दररोज येत आहेत.

     आनंदाने महाभोजन घेऊन आनंद घेत आहेत. सर्व भागातील भाविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने दररोज उपस्थित राहात आहेत.

चौकट

     प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात आन्नदान सेवा करण्यात येत आहे.