भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील रांगी बायपास रोडवर भ्रमनध्वनि मनोऱ्या समोर धान भरून उभ्या असलेल्या ट्रक ला चारचाकी वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले तर गाडी शतिग्रस्त झाल्याची घटना दिनांक 22/12/2023ला दुपारी 12.00 वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की,मोहलि येथुन धान भरलेले मिनी ट्रक क्रमांक MH40Y3201 रांगी वरुण आरमोरीला जात होते.जात असताना रांगी बायपास रोडवरील भ्रमणध्वनी मनोरा समोर तिनं धान्य भरलेले ट्रक उभे होते.त्यापैकी समोर असलेले ट्रक क्रमांक MH40Y3201ला समोरुन येणारे चारचाकी वाहन( बलेनो) पांढरा रंगाची गाडी क्रमांक. MH33V1946 ने धडक दिल्याने चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र किरकोळ जखमी झालेल्या व्यक्ती मधे सौ.अंजली स्पार्टा शेन्डे अंदाजे वय ३५वर्ष आणि ड्रायव्हर सुरेंद्र नैताम वय ३०वर्ष आहे.त्यांना रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करन्यात आले.