भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
कटेझरी पोलिस मदत केंद्र तर्फे गुरेकसा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना हरणीची लहान पिल्लू आढळले. लागलीच त्यांनी प्राथमिक औषधोपचार करून वनविभागच्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द करून हरणीच्या पिलाला जीवदान दिले.
याप्रसंगी कटेझरीचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप साखरे,पोलिस हवालदार मनोज डोंगरे,कैलास गेडाम,संदीप कुमोटी,गोविंद उईके,एसआरपीएफ गट क्रमांक 5 चे पोलिस बल,आदींनी हरणीच्या पिलाला वनविभागाचे वनरक्षक गावडे,वनमजूर मारगाये यांच्या स्वाधीन केले.
हरणीच्या पिलाला जीवदान दिल्यामुळे कटेझरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.