बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्र्यांचे राजवर्धनदादा पाटील यांनी मानले आभार.
इंदापूर : – राज्यातील शेतकरी संकटात असून सर्वत्र दुधाचे दर कमी झाल्याने अजूनच शेतकरी संकटात सापडला होता. त्या अनुषंगाने आपण राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दुग्ध विकास अधिकारी यांची हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत भेट घेत त्यांच्याकडे सातत्याने दूध दरवाढ व्हावी व शेतकरी संकटातून कसा बाहेर येईल यासाठी पाठपुरावा केला होता.
याच आपल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार राजवर्धन पाटील यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मानले आहेत.
हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल समस्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हर्षवर्धनजी पाटील व राजवर्धनदादा पाटील यांचे देखील आभार व्यक्त केले आहेत.