रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :-
संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना,विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म २९ एप्रिल १९०९ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मौजा यावली येथे झाला.
त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) हे होते. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या समाज प्रबोधनाचे खास वैशिष्ट्य होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशालाच देव मानणारे संत होते.त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात केवळ आणि केवळ देशाच्या विकासाचाच विचार केला.
तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या व खंजिरी भजनांच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्रनिर्माण हे ध्येय ठेवून कार्य केले.त्यासाठी परंपरागत अनिष्ट रुढी, जाती-धर्म-पंथ भेद, अंधश्रद्धा, इत्यादी समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी
समाजासमोर मांडले.असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजूकर यांनी आज चिमूर तालुक्यातील श्री.गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर यांच्या सयुक विद्यमाने तीन दिवसीय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्ताने गोपाल काल्याच्या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून केले.
यावेळी,चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, माजी पंचायत समिती सदस्य सौ.भावनाताई बावनकर, ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगलाताई मुंघांटे, पिताजी बावणकर,गुलाबजी ग्रामगिताचार्य हेमंतजी मेश्राम,ह. भ. प. लांजुळकर महाराज,रोशन बावनकर, एकनाथ आष्टणकर,दिपक बघिले,उपस्थित होते.