शिवसेचे नेते,खासदार अनिल देसाई यांची पारशिवनी येथील शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी पारशिवनी येथील विधानसभा प्रमुख श्री.विशालजी बरबटे यांच्या छत्रपती शिवाजी चौक येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

        या भेटी अंतर्गत स्थानीक पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच पक्ष संघटनांबाबत सविस्तर चर्चा खासदार अनील देसाई यांनी केली.

         रामटेक विधानसभा हा आपल्या पक्षासाठी आस्थेचा विषय असून येथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्याचे काम करा,सरकारच्या फसव्या योजनांमुळे जनता अत्यंत नाराज असून त्यांना पुढील निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार आहेत.त्यामुळे आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संपूर्ण ताकदीने कामाला लागायला हवे असे खासदार अनिल देसाई यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

           विधानसभा मतदार संघ व येथील जनता ही आदरणीय बाळासाहेबांची आहे.त्यामुळे जनता आपल्या सोबत आहे.तयारीला लागा व भगवा फडकवा असा मूलमंत्र श्री.खासदार अनिल देसाई साहेब यांनी पाराशिवनी येथे उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी यांना दिला.

           यावेळी शिवसेना पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे,लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री.उत्तम कापसे,सल्लागार श्री.अरुणजी बन्सोड,पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार,रामटेक तालुका प्रमुख श्री.हेमराज चोखांद्रे,युवासेना जिल्हा प्रमुख श्री.लोकेश बावनकर,कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री.समीर मेश्राम, पारशिवनी उपतालुका प्रमुख श्री. सुनील सहारे, पारशिवनी तालुका संघटक श्री.गणेश मस्के, पारशिवनी तालुका सचिव श्री. संजय देसाई, युवासेना पारशिवनी तालुका प्रमुख श्री.किशोर बावनकुळे, विभाग प्रमुख करंभाड श्री. प्रशांत लकडकर,विभाग प्रमुख टेकाडी श्री. जितेंद्र जांबे, विभाग प्रमुख माहुली श्री. आशिष ढगे, अश्विन कुसुबें ,श्री.इंद्रपाल बोरकर,श्री.सुनील डोनारकर, श्री.रुक्षित भौतकर, प्रफुल वासनिक, सह सोशल मीडिया प्रमुख हर्षल सावरकर,निखिल राऊत व इतर आघाडी चे पदाधिकारी, शिवसैनिक मोठी संख्येत उपस्थित होते.