सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
धानाच्या गंजीला आग लागुन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी पहाटे रोजी निदर्शनास आली.बंडु बाबुराव मांदाळे असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नांव असुन तोचारगाव येथील रहिवासी आहे.
जंगलव्याप्त,आदीवासी भाग असलेल्या चारगाव भागात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी असुन शेतीसह,शेळ्या,मेंढ्या,दुग्ध जनावरे पाळणे,मोलमजुरी करणे हा या भागातील लोकांचा व्यवसाय आहे.
याच भरोश्यावर कुटुंबाचे पालनपोषण केले जाते,सध्या खरीप हंगामातील धान पिकाच्या कापणी,बांधणी आणि चुरण्याच्या कामाला वेग आला आहे,त्यामुळे अनेक शेतकरी आधुनिक तंत्राचा उपयोग करून धानपिकाचे चुरणे करीत आहेत तर अनेक शेतकरी पारंपरिक पध्दतीने सुध्दा चुरचे करीत आहेत.
त्यामुळे या भागातील कित्येक शेतकऱ्यांच्या धानपिकाच्या डिबल्या शेतात उभ्या दिसत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकरी बंडू मांदाळे यांनी सुध्दा आपल्या शेतात धानपिकाची डिबली उभी केली होती. काही दिवसातच चुरणे होणार असताना सोमवार रोजी अज्ञात ईसमाने शेतातील गंजीला आग लावली.यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
मंगळवार रोजी धान पिकाच्या डिबलीची पाहणी करण्यासाठी मुलगा गेला असता,धानाच्या गंजीला आग लागल्याची बाब निदर्शनास आली.या संदर्भात सावली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून ऐन तोंडी आलेला घास हरविल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.
ओल्या आणि सुक्या दुष्काळाने भरडला जाणारा शेतकरी यंदाच्या हंगामातील समाधानकारक उत्तन्न हाती येत असताना अशा विकृत मानसिकतेतुन घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा कर्जाच्या खाईत ओढल्या जात आहेत.
तेव्हा नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून केली आहे …..