युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
कर्ज व बेरोजगारीला कंटाळून ३८ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (१९) सकाळी पाच वाजताच्या सुमारास खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील रामगाव येथे घडली.
अमोल विलासराव ठाकरे (३८) रा.रामगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन अमोल हा रुग्णवाहीकेवर कंत्राटी चालक म्हणून काम करीत होता.तिन महिन्यापासून तो बेरोजगार होता.काम नसल्याने तो आर्थिक विवंचनेत होता.
मृतक अमोल ठाकरेकडे दोन एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते.हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक विवंचना सापडला होता.याचबरोबर डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे या नैराश्यतुन त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद् घटना घडली.
घटनेची माहीती खल्लार पोलिसांना मिळताच खल्लार पोलिस स्टेशनचे ज्ञानेश्वर सिडाम, परेश श्रीराव,दिलीप इचे यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा व मृतकाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठविला.
मृतकाच्या पश्चात आई,पत्नी,६ वर्षाची मुलगी व ४ वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे.