उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती तालुक्यातील संसद आदर्श ग्राम चंदनखेडा म्हणून ओळख असणारे चंदनखेडा या परिसरात मोठ्या प्रमानांत प्रशासनाचा महसूल बुडावीणारे अवैध रेती वाहतुकीची चोरी सुरु होती. यावर भद्रावती पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चंदनखेडा येथे दहा ब्रास असलेला एक हायवा अवैध रेती वाहतुक करताना जप्त करण्यात आला.
प्राप्त माहिती नुसार, दिनांक 17 ला रात्री दरम्यान चंदनखेडा परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असल्याची माहिती मीडाली. सदर पोलिसांनी चंदनखेडा पेट्रोल पंप जवळ 10 ब्रास असलेला अवैध रेतिचा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. सदर ट्रक हा सुधीर मुड़ेवार रा चंदनखेडा या व्यक्तीचा असून कलम 379 अनव्ये भद्रावती पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशन ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केली आहे. पुढील कारवाईसाठी सदर प्रकरण तहसीलदार अनिकेत सोनवने यांचेकडे दिले आहे. आणि दि 15 ला काटवल भगत येथे दामोदर गजभे यांचे शेतात 40 ब्रास रेती साठा सुद्धा जप्त करण्यात आला, हा रेती साठा सुधीर मुड़ेवार या व्यक्तिचा असल्याची चर्चा आहे.