प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- तालुक्यातील कोरेगाव व विहीरगाव येथे अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली व अफार्म पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता शेतकरी मेळावा घेण्यात आला होता.
दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी कोरेगाव येथे तर १७ डिसेंबर २०२३ रोजी विहीर गाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सध्याच्या रासायनिक शेतीच्या तुलनेत जैविक व नैसर्गिक शेतीच शेतकऱ्यांना पूरक असून कमी खर्चिक शेत असल्याचे प्रतिपादन शेतकरी मेळाव्यात मुख्य जैविक शेती मार्गदर्शक ऋषी सहारे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हटले आहे.
तद्वतच हवामानाकुल अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रकल्प अंतर्गत अल्प-भूधारक कोरडवाहू शेतकरी यांना अल्प खर्चिक शेती तंत्र ज्ञानविषयी क्षमता वर्धन व्हावे व कोरडवाहू भागातील छोट्या,अल्प-भूधारक शेतकऱ्यांपर्यंत अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान पोहचविणे व रब्बी हंगामासाठी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती,गांडूळखताचे महत्व,दशपर्णी,जिवामृत उपयोगाचे महत्त्व विषद करण्यात आले.
यावेळी दोन्ही ठिकाणी उद्घाटक म्हणून तेथील सरपंच होते तर अध्यक्ष स्थानी तेथील पोलीस पाटील होते.
मुख्य मार्गदर्शक म्हणून ऋषी सहारे आणि ढोलणे व मेश्राम तालुका कृषी सेवक हे होते.सरपंच सुनील नंदनवार,बालाजी गेडाम,पो.पा.ओमप्रकाश मडावी,उपसरपंच गेमराज टेंभुर्णे,खुशाल बावणे,कविता दर्रो, सदस्य,परसराम मडकाम अध्यक्ष – तंटामुक्त समिती कोरेगाव,आदी मान्यवर उपस्थित होते.
विहीरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात – खुशाल वेलादे सरपंच, सौ.रुपकला मडावी पोलिस पाटील, मंगेश चापले प्रगतीशील शेतकरी गणेशपुर,सौ.दामिनी पोटे सदस्य, आशा पेंदाम उमेद प्रतिनिधी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
मेळावा यशस्वीते करिता निकेश ताडाम,प्रेमिका कुमोटी,मंदिरा किरंगे,राहुल मडावी यांनी सहकार्य केले.
संचालन,प्रास्ताविक व आभार अकील शेख सचिव अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांनी केले.