ओबीसी कुटूंबातील सदस्यांना मोदी आवास योजनेंतर्गत लाभ देताना जात प्रमाणपत्राची अट नसावी.. — सदस्य श्री.सतीश घारड,सरपंच विद्या चिखले यानी खंड विकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी : राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे.या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ओबीसी पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ या योजनेतून मिळणार आहेत.

          योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल लाभासाठी जातीचे प्रमाणपत्र तयार करतांना समस्या येत आहेत.

            अशा पात्र लाभार्थ्यांच्या रक्ताच्या कुटूंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्यास सुट देण्यात यावी,अश्या मागणीचे निवेदन टेकाडी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड,सरपंच विद्या चिखले ग्राम पंचायत वराडा यांनी खंड विकास अधिकारी पारशिवणी यांना दिले आहे.

           ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे,जात प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची जुडवा जुडव करतांना लाभार्थ्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे.

              वेळेत जात प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने ओबीसी प्रवर्गातील खऱ्या अर्थाने ज्यांना आवास योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे,असे लाभार्थी जात प्रमाणपत्राची अट असल्याने आवास योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता सतीश घारड यांनी व्यक्त केली आहे,तेव्हा सदर योजनेचा लाभ गरजू कुटूंबाला मिळावा यासाठी लाभार्त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्यास सुट देण्यात यावी असी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

               ओबीसी प्रवर्गातील गरजू कुटूंबाने देखील तात्काळ या योजनेचा लाभ देऊन हक्काच्या घरात प्रवेश करता यावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे,प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड,सरपंच वराडा विद्या चिखले,पूनम भोवते प्रामुख्याने उपस्थित होते.

***

कोट..

             सतीश घारड (ग्रा.पं. सदस्य टेकाडी (को.ख.) व सरपंच वराडाची विद्याताई चिखले 

इतर मागास प्रवर्गासाठी घरकुला संदर्भात कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नव्हती.त्यामुळे या प्रवर्गातील कुटुंब पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहत होते.

          अशातच ओबीसी प्रवर्गासाठी पहिल्यांदा कुठली योजना राबविण्यात येत आहे.मात्र,त्यातही जातीचे प्रमानपत्र सक्तीचे करण्यात आले असल्याने अत्यंत गरजू लाभार्थ्यांकडे जात प्रमापत्राची जुळवा जुळव करणे अत्यंत कठीण होत आहे.

             या विषयाकडे सरपंच संघटने सोबत ओबीसी पुढाऱ्यांनी लक्ष देऊन ओबीसी प्रवर्गाला आवास योजनेचा लाभ मिळणे सुलभ करावे.

      सौ.विद्याताई चिखले

              सरपंच

         सतीश घारड

    ग्रामपंचायत सदस्य