अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची दिली धमकी… — तिघांविरुध्द गुन्हे दाखल,मौजा कसबेगव्हान येथील घटना..

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक 

     गजानन महाराज ग्रंथाच्या पारायणात दारु पिऊन नाचण्यास मनाई का केली या कारणावरून तिघांनी ३३ वर्षीय इसमास अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा कसबेगव्हान येथे (१५ डिसेंबर) आज सकाळच्या सुमारास घडली. 

         याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द खल्लार पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले.

            मौजा कसबेगव्हान येथे गजानन महाराज ग्रंथाच्या पारायणाची पालखी काल गावातून निघत असतांना या पालखीत गावातीलच मयुर राजु मोरे,निखिल राजु मोरे,गोविंदा पंडीत दामले हे तिघेहीजण दारु पिऊन नाचत होते.यामुळे पालखीतील कार्यकर्त्यानी तिघांना बाहेर काढले.

           याबाबतची तक्रार खल्लार पोलिसांत (१४ डिसेंबर) रात्रीच्या वेळी दाखल करण्यात आली होती.

          दुसऱ्या दिवशी (डिसेंबर १५) सकाळच्या सुमारास तिघेजण फिर्यादी निखिल विनायक गणेशपुरे(३३) यांच्या दुकानावर जाऊन काल रात्री तू आम्हाला मारहाण केली व पालखी सोहळ्यातून बाहेर असे म्हणत अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची तक्रार फिर्यादी याने खल्लार पोलिसांत दिली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी तिनही आरोपींविरुध्द कलम २९४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.