महिलेस विटेने मारहाण,बेंबळा खुर्द येथील घटना..

युवराज डोंगरे

  उपसंपादक 

खल्लार:- खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा बेंबळा खुर्द येथे महिलेस विटेने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली असून महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         बेंबळा खुर्द येथील सागर प्रभाकर मिलके (२८)याच्या घरासमोर आरोपी प्रेमसागर रुपराव राणे (६०) यांनी दिड महिन्यापासून गिट्टीचा गंज लावून ठेवला होता.

          घटनेच्या दिवशी फिर्यादीची आई आंगण झाडत असताना आरोपी याने फिर्यादीच्या आईस आंगणातील झाडत असलेली माती माझ्या गिट्टीच्या गंजावर येत असल्याकारणाने विटेने मारहाण करुन जखमी केले. 

          फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द खल्लार पोलिसांत कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.