
भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने पोलिस अधीक्षक निलोत्पल,सा.मा.पो. अधीक्षक याच्या संकल्पनेतून,उप विभागीय पोलिस अधिकारी भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केन्द्र चातगाव येथे भव्य जनजागरण मेळावा व आदिवासी रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते.
सदर भव्य जनजागरण मेळावा व आदिवासी रेला नृत्य स्पर्धेचे उद्घाटन गोपाल उईके सरपंच चातगाव यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मगर मॅडम,मनीषा सातपुते अधिक्षिका मॅडम माध्यमिक आश्रमशाळा गीरोला,चौधरी मॅडम,गेडाम पो.पा.मेंढाटोला त्याचप्रमाणे पोलीस मदत केंद्र हद्दीतील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या प्रमूख उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा,यांच्या प्रतीमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करून भव्य जनजागरण मेळावा /आदिवासी रेला नृत्य स्पर्धेची सुरवात करण्यात आली.
यावेळी पोमकेचे प्रभारी अधिकारी संतोष पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी यांनी प्रास्ताविक करून सदर स्पर्धेचा उद्देश व पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.
आदिवासी रेला नृत्य स्पर्धेकरीता पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 12 संघानी सहभाग नोंदवून उत्कृष्ट पणे आपले नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
सहभागी संघातून प्रथम क्रमांक पोरेडीवार शाळा रेला ग्रुप,द्वितीय क्रमांक दुधमाळा रेला नृत्य संघ व तृतीय क्रमांक माध्यमिक आश्रम शाळा गिरोला रेला नृत्य संघ यांनी पटकाविले असून प्रथम,द्वितीय व तृतिय क्रमांक संघाना अनुक्रमे 3000 /-, 2000/-, व 1000/ रुपये असे रोख पारीतोषीक देऊन गौरवीण्यात आले व इतर स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
नमूद जनजागरण मेळाव्यात VLE मार्फत खालील योजनांचा लाभ देण्यात आला.याच कार्यक्रमाच्या प्रसंगी साड्यांचे वाटप करण्यात आले.
सदर जनजागरण मेळावा व रेला नृत्य स्पर्धेकरीता पो.म.के. चातगाव हद्दीतील 300 ते 350 स्त्रि- पुरुष नागरीक उपस्थित होते.
उपस्थित संघाची व नागरिकांची भोजनाची व्यवस्था करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.