दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी देवस्थानवर स्थानिक विश्वस्त असावे म्हणून आळंदी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आळंदी बंद वर प्रतिक्रिया देताना प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याने आळंदीकर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आळंदीकरांनी केला होता याचं अनुषंगाने कार्तिक शुद्ध दशमीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी अखेर त्या वक्तव्याबद्दल आळंदी ग्रामस्थांची दिलगीर व्यक्त केली आहे.
यावेळी देसाई हे म्हणाले की आळंदी ग्रामस्थांच्या संदर्भात दिनांक ०३ डिसेंबर रोजी माझ्याकडून अनावधानाने काही विधाने व्यक्त केले गेली त्यामुळे आळंदी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्याबद्दल समस्त आळंदीकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
प्रमुख देसाई यांचे वादग्रस्त वक्तव्य
विश्वस्त निवड हा जिल्हा न्यायालयाचा निर्णय आहे. आलेले अर्ज आणि नावे आम्ही न्यायालयाकडे पाठवली होती. त्यामध्ये आळंदीकरांचीही नावे होती. ही निवड प्रक्रिया उघडपणे आणि पारदर्शकता होती. अनेक वर्षांचा इतिहास पाहता आळंदीकरांचे यापूर्वी अर्जच नव्हते. माऊलींची सेवा सर्वांकडून व्हावी हीच आमची भावना आहे. सहाही विश्वस्त आळंदीतून झाले तर हरकत नाही. तसे योगदानही असले पाहिजे.
आळंदीकर म्हणून देवस्थानला मदत काय आहे. आजपर्यंत विकासकाम काहीच झाले नाही म्हणणे चुकीचे आहे. गायरान विकसनासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला आहे. शासनाकडून गायरानाची जागा आम्ही सोडवली. अन्नछत्र,मंदिर व्यवस्थापन आदी कामे आमच्या काळात झाली आहेत.