सुधाकर दुधे
तालुका प्रतिनिधी सावली
सावली पंचायत समिती एकात्मिक बाल विकास प्रकल्पअंतर्गत शिक्षण हे वाघिणीची दूध आहे ते जो प्रासंग करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” अशी सिंहगर्जना करणारे विश्ववंदनीय, महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद जोनमवार तर प्रमुख अतिथी वर्षा मडावी मॅडम,शालिनी मशाखेत्री बिंदीसार भसरकर नरेंद्र प्रधाने माया लेनगुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. एकात्मिक बाल विकास चे अधिकारी प्रमोद जोनमवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब हे खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून शिक्षणाला किती महत्त्व आहे शिक्षणाने मनुष्य समृद्ध होतो माणसाचे विचार समृद्ध होतात शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे प्रभावी शस्त्र होऊ शकते असे मौलिक विचार यांनी ठेवले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत, भाषणे सादर केलेत. कार्यक्रमाचे संचालन पद्मा मोहूर्ले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सपना कुलमेथे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.