दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत लाखों वारकरी येत असतात आळंदी बंद ठेवून आळंदीकरांनी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आळंदी बंद ठेवू नये असे आवाहन विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील यांनी आळंदीकरांना केले आहे.
श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने उद्या कार्तिकी वारीला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर आळंदी ग्रामस्थांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांचे व आळंदीकर ग्रामस्थांचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे ऋनानुबंध आहे संस्थान कमिटी आळंदीकरांना व आळंदीकर ग्रामस्थ संस्थान कमिटीला वेगवेगळ्या स्वरूपात मदत व सहकार्य करत आहेत. जो काही वाद विश्वस्त नियुक्ती वरुन उद्भवला आहे, त्याला अनुलक्षून येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, येणारा वारकरी माऊलींच्या श्रध्देपोटी येत असतो, आळंदीत येणाऱ्या भक्तांची श्रद्धा व भक्ती विचारात घेऊन तसेच अनेक वर्षांपासून आळंदीकर ग्रामस्थांनी येणाऱ्या वारकऱ्यांचा पाहुणचार केला आहे, तसाच पाहुणचार व स्वागत आळंदीकरांनी करावे, आळंदीकरांनी येणाऱ्या वारकरी भाविकांची आळंदी बंद मुळे गैरसोय होऊ नये त्यामुळे आळंदी ग्रामस्थांनी बंद ठेवू नये असे आवाहन विश्वस्त ढगे पाटील यांनी केले आहे.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ आळंदीकरांना वेळेला काहीच मदत करत नाही, तसेच आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय.? असे वक्तव्य करणाऱ्या विश्वस्ताने पुढे येऊन आपली भुमिका मांडावी, उद्या होणारा आळंदी बंद होणारच असे आळंदी ग्रामस्थांच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले पाटील यांनी सांगितले.