५ राज्याचा फाईनल…. — आणि विचित्र अंदाज येवू लागलाय? — खंत कि चिंतन?

 

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

            पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकी अंतर्गत उद्या मतमोजणी होत आहे.मतमोजनीतंर्गत राजकीय आखाड्याचा सारीपाट सुध्दा स्पष्ट होणार आहे.अर्थात उद्याचा फाईनल बसपा,भाजपा,काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांच्या मतदार शक्तीचा अंदाज असेल.तद्वतच निवडणूकीच्या मैदानात असलेल्या सर्व पक्षांची व अपक्षांची लोकप्रियताही उद्याच्या निकालानंतर कळेल.म्हणूनच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या,पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या धडकनांनी वेग घेतला असून विधानसभा निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

           बसपा हा पक्ष सत्तेवर येण्यासाठी वास्तविक सत्याचे व सत्यातील वास्तविकतेचे प्रमाण मतदारांना नेहमी सांगतो आहे‌.मात्र,धर्म आणि जातीच्या रुढार्थात देशातील मतदारांनी सत्य आणि वास्तविकतेला वारंवार महत्वहीन बनवले असल्याचे अनेक विधानसभा व लोकसभा निकालांवरून लक्षात आले आहे.

               “निवडणूकातंर्गत सत्य आणि वास्तविकतेला जाणून घेण्यास,देशांतर्गत मोठ्या प्रमाणातील मतदार वैचारिक प्रगल्भ नसेल तर त्या देशातील लोकशाहीला मतदारच कमकुवत करण्यास कारणीभूत ठरतात असे चित्र पुढे आल्यावाचून राहणार नाही.

           अर्थात विधानसभा व लोकसभा निवडणूकातंर्गत सत्य आणि वास्तविकतेची पारख न करणारा मतदारच,”स्वतःचे अस्तित्व व अधिकार स्वतःच नाकारतात,असीही धारणा बनेल आणि ही धारणा बहुसंख्य समाजातील नागरिकांना परवडणारी नसेल,असा विचित्र अंदाज भारता सारख्या लोकशाही गणराज्य देशात ७३ वर्षांनंतरही येतो आहे.असा अंदाज येवू लागणे म्हणजे या देशातील राजकारण्यांच्या संकुचित मानसिकतेचे दर्शन होय.

            ३ डिसेंबर २०२३ रोज रविवारला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार व पक्ष बलाबल कळणार,पण निवडणूकांच्या माध्यमातून लोकशाही हरायला नको.लोकशाही हरली तर देशातील नागरिक हरले असे होईल.

         लोकशाहीला जिवंत ठेवणारी महत्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे देशांतर्गत लोकसभा व विधानसभा निवडणूका होत.या निवडणुका अंतर्गत नेहमी सत्याचा व वास्तविकतेचा विजय होण्यासाठी मतदार हा समजदार व जाणकार असायलाच पाहिजे.

               पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा निकाल राजकीय नेतृत्वाला,पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आनंद देणारा व नाराज करणारा असला तरी भारताच्या मजबूत लोकशाहीसाठी सकारात्मक असेल.