चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी: स्थानिक समर्थ महाविद्यालयात दि २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘’संविधान दिन‘’ अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. या अनुषगाने प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे यांनी सर्व प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी यांना ‘’संविधान दिन‘’ निमित्त मार्गदर्शन करून प्रत्येक घटकाने आपल्या परिसरातील सुजाण नागरिक, पालक, मित्रमंडळ यांना एकत्रित करून त्यांना भारतीय साविधानाचे महत्व विशद करून त्यांच्या समवेत भारतीय राज्यघटनेची उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून संकल्प घेण्याचे आवाहन केले.
त्याला अनुसरून प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी यांनी आपल्या परिसरात, गावात संविधान दिनाचा जागर करून भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. लाखनी परिसरात यामुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. समर्थ महाविद्यालयाने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून परिसरात देशभक्तीमय वातावरण तयार करण्यात सिंहाचा वाटा उचल्ल्याब्द्द्ल राष्ट्रीय संथेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी प्राचार्य तथा सर्व महाविद्यालीयीन घटकांचे अभिनंदन केले.
या अभिनव उपक्रमाकरिता राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा याजना, छात्रसेना, सास्कृतिक विभाग यांनी अथक परिश्रम घेतले.