सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली तालुक्यातील रेती,गिट्टी व मुरूम चोऱ्या या परिसराला काही नवीन नाही.या परिसरात अनेक बलाढ्य तस्करांचा सूळ सुळाट असताना प्रशासन गप्प आहे.
तस्करांना अभय कुणाचे आहे यावर अनेकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले असले तरी सामान्य जनते पुढे तस्करांना अभय देणारे येत नसल्या मूळे याचा फटका सामान्य जनतेलाचं बसत आहे.
सावली तालुक्यात अनेक शासकीय बांधकाम सुरु आहेत.याचबरोबर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोर – गरिबांना घरकुल योजना सुद्धा मिळाली आहे.
परंतु रेती घाट सुरु नसल्याने,रेती तस्कर मनमानी भाव घेत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ घरकुल धारकांना सहन करावी लागतं आहे.सामान्य माणसांना रेतीची गरज असल्याचे बघता रेती तस्कर मात्र समस्यांचा व गरजेचा फायदा घेत आहेत.
भर दिवसा रेती -गिट्टी चे भाव दुपट्ट करून सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावण्याचा काम तस्कर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत.या मूळे सामान्य माणसाची आर्थिक गळचेपी झाली आहे.
सावली तालुक्या लगत वैनगंगा नदीचे घाट आहे.त्यात बोरमाळा घाट,साखरी घाट,उसेगाव,अशे बरेच घाट प्रसिद्ध आहेत,सध्या स्थितीत हे घाट शासनाने लिलाव न केल्याने या ठिकाणातून रोज रेतीची तस्करी होते.या रेती तस्करी मध्ये अनेक बलाढ्य रेती तस्करांनी रेतीचे चोरटे धंदे करून मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याची सुद्धा चर्चा या परिसरात आहे.
त्या सोबतच कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने या परिसरातील अनेक छोटे रेती,मुरूम तस्कर सुद्धा मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत,परंतु या परिसरातील प्रशासन गाढ झोपेत असल्यामुळे रेती तस्करांची मजा काही औरच आहे.
रेती व मुरुम तस्करी संबंधाने जाणूनबुजून येथील स्थानिक प्रशासन गाढ झोपेत असल्याची जनचर्चा आहे.तालुक्याच्या मुख्य ठिकाणी हा प्रकार जरी कमी असला तरी तालुक्यातील अनेक गावात रेती, मुरूम तस्कर भर दिवसा काळे धंदे करीत असल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तालुक्यात दोन पोलीस स्टेशन असून तालुक्याच्या ठिकाणी महसूल विभाग,वनविभाग कार्यालय आहेत त्याच प्रमाणे तालुक्यातील बाजारपेठ असलेले पाथरी या ठिकाणी इंग्रज कालीन पोलीस स्टेशन,वनविभाग,एफ डी सी एम कार्यालय,मंडलं अधिकारी कार्यालय,तलाठी कार्यालय असे अनेक कार्यालय असताना सुद्धा रेती तस्करांची भर दिवसा फावते कशी?हा कमालीचा प्रश्न जनतेच्या समोर उभा असला तरी आजची परिस्थिती बघता सामान्य जनता तस्करांविरुध्द पुढे येण्यास तयार नसल्याने रेती तस्करांची सद्या या परिसरात मजाच मजा आहे.
तस्करांनी माया जमविण्याबाबत प्रशासन सहकार्य करीत असल्याचे आम जनतेकडून बोलणे वावगे ठरणारे नाही?