तालुक्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका ….. — शेतकरी भयभीत.. — सरर्ड्या,पुंजने,तुळीचे नुकसान.. — यंदाही दुष्काळ!..

      सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली 

               चंद्रपूर जिल्ह्यासह सावली तालुक्यात आज झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकासह ईतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकरी राजा भयभीत झाला असून पुन्हा एकदा दुष्काळाचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

            शेतात असलेले पुंजने,सर्ड्यासह तुळीचे आजआलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे मत शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.यंदा ख़रीपाचे मोठे नुकसान होत आहे.नेहमीची ही परिस्थिती यंदाच्या हंगामा दरम्यान शेतक ऱ्याचे कंबर्डे मोडण्यासरखी असून ओल्या दुष्काळाची शक्याता वर्तविली जात आहे.

         यंदाचा खरीप हंगाम उशिरा सुरु झाला असताना शेतकऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता धान पिकाची रोवनी केली.उशिरा येणारा पाऊस उशिरा पर्यन्त साथ देईल अशी आशा होती.मात्र पावसाने दाड़ी मारली व परिणामी गोसे अंतर्गत ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावाच्या माध्यमातून धानपिकाची रोवनी संपली.

          धनपिक उभे झाले,मात्र सततच्या दमट वातावनामुळे धानपिकावर रोग़ाचे सावट निर्माण झाले.अनेक महागाडी किटक नाशके फवारुन सुद्धा रोग़ावर नियंत्रण करणे कठिन झाले.धानाची गर्भावस्था पासून सातत्याने रोगाचा प्रादुर्भाव कायम होता.

          परिणामी धान पिक कापनीला आणि हाती आल्यानंतर नेहमी प्रमाणे अवकाळी पावसाने सुरुवात केली.आजच्या घडिला शेतकऱ्याच्या धनपिकाची कापनी झाली.सर्ड्या बाँधावर व पुंजने उभे असताना पावसाने सुरुवात केल्याने यंदाच्या ख़रीप हंगामातही शेतकऱ्याचे मोठे नुक़सान होताना दिसते आहे.

          अवकाळी पावसाने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या धानपिकाची नुकसान लक्षात घेता त्याचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

          दमट वातावर्णामुळे पावसाचा अंदाज पुढेही वर्तविल्या जात असून अवकाळी पावसामुळे पुंजने,सर्ड्या (अडाळशा), तूळ ,पराटी,आदि पिकांची मोठी नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.

        परिणामी शेताच्या बाँधावर टाकलेले धानपिकाचे पुंजने पाण्याने खराब होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यानी पुंजन्याच्या सुरक्षेसाठी पालीथिन,त्रिफ़ाला आदिच्या उपयोग केल्याचे दिसुन येत आहे.

         विशेष म्हणजे यांदाचा साधलेला ख़रीपाचा हंगाम अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण करणारा ठरत असल्याने शेतकरी राजा चिंतातुर झाल्याचे दिसुन येत आहे..

****

कोट…

मायबाप सरकार लक्ष द्या हो…..

         दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी स्वता कष्ट करुण शेती पिकविणारे,एक दान्यापासुन हजार दाने निर्माण करणारे माझे मायबाप शेतकरी बांधव आज मात्र निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे हतबल झाले आहेत.त्यांना कोन आधार देईल?या आशेने वाट बघत आहे.शेतकऱ्याच्या शेतात धान कापुन आहे,सर्ड्या भीजत आहे,कापूस ओला होत आहे,तुळीचा बार झडत आहे,त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसते याकडे मायबाप सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे…

अनिल स्वामी 

अध्यक्ष,विविध कार्यकारी सहकारी संस्था सावली..