कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशीवणी
कन्हान : – तारसा रोड आदिवासी गोवारी स्मारक येथे आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान द्वारे ११४ आदिवासी गोवारी शहिद बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
गोवारी समाजाचे अनुसूचित जमाती ला आरक्ष णात समाविष्ट करण्याचा मागणी करिता आदिवासी गोवारी समाज संघटने च्या वतीने आंदोलन करण्यात आले असुन २३ नोव्हेंबर १९९४ मध्ये आदिवासी गोवारी समाज बांधवांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला होता. ज्यात पोलिसांनी अमानवी कृत्य करुन लाठीचार्ज केल्याने ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. परंतु २९ वर्षां नंतर ही गोवारी समाजाला अद्याप न्याय मिळाला नाही आहे.
गुरूवार (दि.२३) नोव्हेबंर ला तारसा रोड आदिवासी गोवारी स्मारक येथे सकाळी आदिवासी गोवारी समाज संघट न कन्हान द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमास प्रामुख्याने उप स्थित नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी सह मान्यवरांच्या हस्ते कामठीची शहिद करुणाताई नेवारे व कन्हान-कांद्रीचे शहिद ताराचंद भोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी नारद दारोडे, नेवालाल सहारे, अनिल ठाकरे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गोवारी समाज बांधवांनी आप ल्या वक्तव्यातुन नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ आदिवासी गोवारी स्मारक बनवुन आदिवासी गोवारी शहिद चौक नाव देण्याची मागणी केली आहे. कार्यक्र मास आदिवासी गोवारी समाज बांधवांनी व नागरिकां नी शहिदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन दोन मिनट मौनधारण करुन ११४ आदिवासी गोवारी शहिद बांध वांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास गणेश पानतावने, महेंद्र चव्हाण, योगेश वाडीभस्मे, रिंकेश चवरे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, मौनिका पौनिकर, सुषमा चोपकर, अनिता पाटील, मनिषा चिखले, संगिता वांढरे, नुतनबाई शेंदरे, सुगंधा बाई भोंडे, अलिशा सहारे, आचल सहारे, आरती ठाकरे , आरती नेवारे, गिता कोहळे, शामकला वगारे, लिल्हा बाई देव्हारे, सिता राऊत, सिता सहारे, नंदा शेंदरे, सोनम सहारे, कांताबाई पोचपोंगडे, वंदना शेंदरे, गणेश राऊत, आनंद सहारे, विनोद कोहळे, अनिल भोंडे, प्रेम लाल नेवारे, छोटु राणे, हरिष तिडके, प्रदिप गायकवाड, ऋषभ बावनकर, अजय चव्हाण, नामदेव राऊत,आका श सोनवने, अरविंद नेवारे, नरेश कोहळे, सोनु कोहळे, उमेश शेंदरे, दुर्गेश शेंदरे सह गोवारी समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.