
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
भारताने प्रथम फलंदाजी करीत आस्ट्रेलियाच्या संघापुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले आहे.मात्र,आस्ट्रेलियाचे गोलंदाज स्टार्क व कमिन्सच्या भेदक माऱ्यामुळे भारताची फलंदाजी ढासळली.
आस्ट्रेलियाच्या कप्ताने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी दिली.
मात्र,आस्ट्रेलिया संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय संघाला अपेक्षित धावा काढता आल्या नाहीत.५० ओव्हर मध्ये भारतीय संघाचे १० गडी बाद करीत २४० धावांवर भारतीय संघाला रोखण्यात आस्ट्रेलिया संघ यशस्वी झाला.
मात्र,खेळात काही होऊ शकते.भारताच्या गोलंदाजांची जादू चालल्यास आस्ट्रेलिया संघाच्या बल्लेबाजांना जेरीस आणून आपल्या बाजूने अंतिम सामना करु शकतात.