काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्पष्ट बोलू लागले… — देश व नागरिकांचा संबंध?

संपादकीय

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक

           लोक कल्याणासाठी उत्तम कार्य करण्याची व कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारणे आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी बोलणे हा महत्वपूर्ण चारित्र्याचा भाग असतो.

           चारित्र्यसंपन्न व्यक्ती हा आयुष्यातील काळात बोललेल्या शब्दांतंर्गत कार्ये करीत राहतो व कर्तव्य पार पाडीत राहतो.व्यक्तीगत आयुष्यात कधीकाळी जबाबदारी पार पाडायला उशीर होतोय.

            मात्र,सत्ताधारी म्हणून किंवा सत्ताधाऱ्यांचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणे व पार पाडणे कठीण राहात नाही.

            लोक कल्याणासाठी बोललेल्या शब्दांतंर्गत वर्तनूक करणे आणि कृती अंतर्गत ध्येय पुर्ण करण्यासाठी धोरणांची आखणी करून,त्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या संबंधाने नेहमी संवेदनशील राहणे आवश्यक आहे.

           स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातंर्गत सदोदित कार्य करणाऱ्यांपैकी माजी प्रधानमंत्री स्व.इंदीरा गांधी यांच्या घराण्यातील सर्व जनमान्य सदस्य होत.मोठमोठ्याला पदावर कार्यरत असतांना त्यांच्या बोलण्यातून शब्दरुपी अहंकार व क्रोध बाहेर पडत नाही यापेक्षा त्यांचे दुसरे धन अमुल्य नाही.म्हणूनच देशातील नागरिकांच्या हृदयात त्यांच्याप्रती जिव्हाळा,आपुलकी आणि प्रेम, अजूनही भरभरून आहे..

               यामुळेच खासदार सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर देशातील नागरिक अपेक्षा ठेवून आहेत.

            आतातर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे पत्रकार परिषदातंर्गत आणि सभातंर्गत स्पष्ट व वाजवी बोलू लागले आहेत.

  राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानचा खासदार राहुल गांधी यांचा उल्लेखनीय मुद्दा म्हणजे अनुसूचित जाती,जमाती, अल्पसंख्याक,ओबीसी,विशेष मागासवर्गीय,समाज घटकांची जातीनिहाय जनगणना करणे होय व लोकसंख्येच्या आधारावर त्यांना राजकीय क्षेत्रात व शासकीय कार्यालयात प्रतिनिधीत्व देणे होय.

              “प्रचार सभेला उपस्थित असलेल्या लाखो लोकांना,” देशांतर्गत जातिनिहाय जनगणना करणार व लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधीत्व देणार,”असे शब्द, खासदार राहुल गांधी यांनी देणे म्हणजे त्यांच्या सार्वजनिक चारित्र्याचा भाग आहे हे समजून घेतले पाहिजे.

              खासदार राहुल गांधी हे भारत देशातील जनतेला टोप्या देणाऱ्यांपैकी किंवा जनतेशी धोखाधाडी करणाऱ्यांपैकी व्यक्तीत्व नाहीत किंवा नेतृत्वही नाहीत असे त्यांच्या आत्मविश्वासातल्या कर्तव्यातून दिसून येते आहे.

            भारतीय राज्यघटने अधिकार बहाल केले असताना आजपर्यंत इतर समाजासह ओबीसींना समान हक्कांपासून वंचित राहवे लागले आहे.(राजकीय घटनाक्रमा संबंधाने काही कारणास्तव मी भूतकाळ जात नाही.)

            यामुळे खासदार राहुल गांधी यांच्यावर जनता अपेक्षा ठेवून आहे की ते तरी आमच्या उन्नतीसाठी,”आमचे हक्क,-“समान प्रमाणात,विविध क्षेत्रात कायम करतील..

                भारत देशांतर्गत काँग्रेस पक्षाचे वजनदार व प्रमुख नेते म्हणजे खासदार राहुल गांधी असल्याने त्यांच्या प्रत्येक शब्दाला पक्ष सत्ताधारी व पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्तागण महत्त्व देतो आहे.

         खासदार राहुल गांधी यांनी एखादा शब्द काढला की त्यांच्या विरोधात जाण्याची कुणीही हिम्मत करीत नाही.त्यांचा शब्द सर्वोतोपरी समजून कामाला लागतात.

            तद्वतच खासदार राहुल गांधी हे भारत देशातील सर्व नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी व हितासाठी स्पष्ट बोलत असल्याने आजच्या स्थितीत ते देशातील नागरिकांचे तारणहार बनले आहेत हे सत्य आहे.

         सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते जगप्रसिद्ध लौकिक प्राप्त करतील असे त्यांच्या कर्तव्यात आहे.

       खासदार राहुल गांधी