संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अनेक व्यक्तींची अनेक मने,या नुसार मनातंर्गत अनेक व्यक्तींच्या असंख्य कृत्या व असंख्य विकृत्या आणि कृत्या व विकृत्या अन्वये अनेक कल्पना-अनेक संकल्पना,अनेक योग्य व अयोग्य भुमिका पुढे येत असतात.
मात्र,व्यक्तींच्या वैचारिक मार्गात विवेक असेल तर ते असे व्यक्ती कुठल्याही घटनाक्रमांची प्रत्यक्ष शहानिशा करतील व सदर घटनाक्रमांचा साक्षात अनुभव घेत समजदारीतून घटनातंर्गत सत्याला मनात स्थान देतील.
परंतु व्यक्तींच्या मनातील विवेक जागृत नसेल तर असे ते व्यक्तीं प्रत्यक्ष घटनाक्रमांची शहानिशा करणार नाहीत.तद्वतच दुसऱ्यांनी सांगितलेल्या माहितीच्या अधिकारावर मन बनवतात व मनात रागाला स्थान देत मनातंर्गत द्वेषाला सक्रीय करतात,असे तत्वतः दिसून आले आहे.
क्रोध व द्वेष हे व्यक्तींना गुरफटून ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात आणि भ्रामक अशा अतर्कसंगत विरोधाभासी भुमिका घेण्यास मनाला चालना देतात.म्हणूनच रागाने व द्वेषाने गुरफटलेले मनुष्यप्राणी हे चित्तपरिशुध्द तर्कसंगत विचारान्वये सत्यापर्यंत पोहोचतच नाही हे सुध्दा कटू सत्य आहे.
तथागत गौतम भगवान बुध्दांनी म्हटले आहे की,”आपन नास्तिक व आस्तिक नाही तर फक्त वास्तविक आहोत.”ताकदीची गरज तेव्हाच पडते,जेव्हा अयोग्य करायचे असते.अन्यथा दुनियामध्ये आपल्या बाजूने सर्वकाही चांगले करण्यासाठी उत्तम विचारान्वये फक्त प्रेम व मैत्रीभावच महत्वपूर्ण आहे..
संयम हा बऱ्याच लोकांना खूप कडवट वाटत असतोय पण संयमाचे फळ खूपच यशस्वी असते हे बारकाईने लक्षात घेतले पाहिजे.तद्वतच चुकलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणारे लोक हे विसरतात की तोच व्यक्ती नेहमी आयुष्यातील योग्य धडे देत असतो.मात्र त्यांच्या कृती अंतर्गत योग्य धडे घेता आले पाहिजे..
याचबरोबर जिवनात तिनं गोष्टी कधीच लपत नाही,”सुर्य,चंद्र,आणि सत्य!..”पण,असत्याला अनुसरून अयोग्य व योग्य शब्दांनी नेहमी वार करणारे व नाहक बदनाम करणारे लोक हे विसरतात की त्यांची शाब्दिक कृती ही बऱ्याच वेळा विकृतीचा एक भाग ठरत असतो व हा विकृतीचा भागच असंख्य लोकांच्या मनात राग आणि द्वेष उत्पन्न करतो किंवा पसरवितो,आणि राग व द्वेषातंर्गत अनेकांना एकमेकांपासून दूर करतो,एकमेकांच्या प्रती कटूता निर्माण करतोय..
तद्वतच रागातून व द्वेषातून अहंकार व क्रोधाचा जन्म होतो.मनावर ताबा नसलेल्या लोकांचा अहंकार आणि क्रोध त्यांना केव्हा काय करायला लावेल याचा नेम राहात नाही.मात्र,राग-द्वेष-क्रोध-अहंकार-कटूता यांना मनात जोपासने म्हणजे स्वतःचा सातत्याने पराभव करणे होय.
समजून घेणे एक कला आहे व ती कला प्रत्येकाला अवगत होईल असेही नाही.”जे लोक राग येणाऱ्या विचारांपासून स्वतःला दूर करतात,त्यांनाच शांतीचा बोध होतोय.म्हणूनच तक्रार व भांडणे करण्यापेक्षा समजदारीतून स्वतःसह दुसऱ्यांना सांभाळून घेतले पाहिजे.
एखाद्या चुकीला मोठ माणन्यापेक्षा त्या चुकीला समजून घेत स्वतःच्या वैचारिक क्षमतेने सदर चुकीला चांगल्यात बदलविले पाहिजे.जो व्यक्ती चुकीला समजून घेत आपल्या वैचारिक क्षमतेने त्या चूकीचा चांगल्यात बदल करतो तोच व्यक्ती सामर्थ्यवान व योग्य असतो.
परंतु योग्य व अयोग्य संबंधाने सखोल माहिती घेण्यापूर्वीच,”विना आधारावर “योग्याला,अयोग्य समजून बसतात व “अयोग्याला,योग्य समजून बसतात अशा वेळी फार मोठे संकट एखाद्या व्यक्तीवर ओढवले जातात याची कल्पना मतमतांतरे रेटून धरणाऱ्यांना अजिबात राहात नाही.
आणि जर,”अयोग्याला योग्य व योग्याला अयोग्य,समजण्यासाठी काही व्यक्ती जाणिव पुर्वक कृती करीत असतील तर ते स्वतःलाच मागे नेतात असे होईल.
माणुसकिचे दुसरे नाव प्रेम आहे.म्हणूनच सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांवर हृदयपुर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
पण,अयोग्य-असत्य व भ्रामक माहिती राग आणि द्वेषाची जननी आहे.ज्या व्यक्तींच्या मनात राग,द्वेष,क्रोध,अहंकार,कटूता,मोह,माया,लोभ,आहे अशांना वेदना व संवेदना कळत नाही किंवा कळूनही त्याकडे दुर्लक्ष करतात,अशांना सखोल दुःखांची,”मन केंद्रे,कळत नाही.म्हणूनच परंम सत्यापर्यंत व्यक्ती पोहोचतच नाही.
मात्र,तथागत भगवान बुद्ध व अहर्त भिख्खूच परंम सत्यापर्यंत पोहोचतात हे अस्सल सत्य आहे.