
प्रदीप रामटेके/रामदास ठुसे
चिमूर वरुन :-
चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध संकटमय समस्या व त्या समस्या अंतर्गत वेदना आणि दुःख समजून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार तयार नाही.
यामुळे नैसर्गिक आणि इतर आपदामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेले नुकसान आणि या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या सखोल वेदना व सखोल वेदनातंर्गत होत असलेले मनस्ताप देणारे दुःख अतिशय गंभीरता निर्माण करतात.
तद्वतच मनस्ताप दुःखातंर्गत शेतकऱ्यांच्या वेदना काय असतात? या संबंधाने त्यांच्या संवेदना महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी,”आज चिमूरात,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा होणार असल्याचे संकेत आयोजकांकडून मिळाले आहेत.
बालाजी देवस्थान चिमूर येथून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असून,सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या कार्यालयाकडे आगेकूच करणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अनेक आपदातंर्गत समस्यांना सामोरे जावे लागते आहे.त्यांच्या गंभीर समस्यांची दखल महाराष्ट्र शासन घेतांना दिसत नाही.यामुळे तमाम शेतकरी बांधव महाराष्ट्र शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांची हाक महाराष्ट्र शासनापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारा आज भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.अविनाशभाऊ वारजूकर हे शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
***
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुटणार विविध प्रकारच्या शब्दांचे जोरदार बाण..
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतिष वारजूकर,राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री.धनराजभाऊ मुंगले,राष्ट्रीय काँग्रेस चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,महाराष्ट्र राज्य सेवादल सहसचिव प्रा.राम राऊत,चिमूर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विलासभाऊ डांगे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी चिमूर तालुकाध्यक्ष संजय घुटके,मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय डोंगरे,चिमूर तालुका सेवादल अध्यक्ष किशोर शिंगरे,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव बिरजे हे मोर्चा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सदर वक्त्यांच्या मार्गदर्शनातंर्गत शेतकऱ्यांच्या हित संबंधाने विविध प्रकारच्या तिक्ष शब्दांचे बाण निघणार आहेत.
***
निवेदन..
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्या बाबत निवेदन देण्यात येणार आहे व त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह इतर मंत्री,अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात येणार आहेत.
***
शेतकरी बांधवांना आव्हान..
चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,चिमूर तालुका महिला आघाडी काँग्रेस पक्ष व चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किसान मोर्चा नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या हित संबंधाने २३ प्रकारच्या मागण्या रेटून धरल्या आहेत.त्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी चिमूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आज होणाऱ्या शेतकरी मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किसान सेलचे चिमूर तालुका अध्यक्ष राजू उर्फ हेमंत कापसे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केले आहे.