घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.

सावली (सुधाकर दुधे)

प्रतिनिधी

    रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावली यांच्या वतीने१४एप्रिल २०२३ रोजी .घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न,महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची१३२ वी जयंती आणि ११ एप्रिल २०२३ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची१९२ वी जयंती संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

     याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावलीचे सन्माननीय अध्यक्ष के.एन.बोरकर साहेब,संस्था सचिव मान.सौ.व्हि.सी.गेडाम मॅडम, संचालक मान.बि.के.गोवर्धन साहेब, संचालिका सौ.सी.आर गेडाम मॅडम, संचालक मान.व्हि.के.बोरकर साहेब, संचालक मान.यु एम.गेडाम साहेब,माजी संचालक मान.आर.के.गेडाम,मान.नि.व्हि मेश्राम,मान.जे.एस.दुधे, प्राचार्य एन.एल.शेंडे,प्र.प्राचार्य पी.जी.रामटेके, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीहोती. 

          कार्यक्रमाची सुरुवात शांतीदुत तथागत गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमांना दिप प्रज्वलन व मालार्पण करुन सस्थाध्यक्ष मान.के.एन.बोरकर यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन बुध्द-धम्म-संघ वंदना घेण्यात आली.

         तदनंतर धम्मपीठावरील कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य एन.एल शेंडे यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले.नंतर लगेच विद्यार्थीनिने भीमगित गाऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. कु..रीया कुंभारे, कु‌ वैष्णवी मडावी यांनी.बाबासाहेबांची शिक्षण विषयक तळमळ,भारतीयाकरिता केलेले सामाजिक चळवळ आणि देशातील नागरिकांना दिलेले संविधान यावर मोलाचे मार्गदर्शन करुन सावली वासियांना मंत्रमुग्ध केले.

           प्रमुख मार्गदर्शक मान.एच.टी.भडके यांनी विज्ञानवादी जीवनाची कास धरताना संविधान वाचायला सुरुवात करुन डोळसपणे विज्ञानाचा अंगिकार करावा तसेच विद्यार्थ्यांनी RTE Act.2009 यांचे वाचन करून आपले अधिकार आणि जबाबदारी समजून घेतले पाहिजे नाहीतर तुमचे जीवन पुन्हा गुलामगिरीकडे गेल्याशिवाय राहणार नाही असे नविन शैक्षणिक धोरण सरकार राबवू इच्छित आहे त्याकरिता जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

    अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना मान.के.एन.बोरकर साहेब म्हणाले की,या देशाला तारण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणीची अत्यंत आवश्यकता आहे हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी १३ एप्रिल रोजी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि भिमगित स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य एन एल.शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे,शिक्षक ए.पी.दुधे कु.रायपूरे मॅडम यांचेकडून रोख पारितोषिक देण्यात आले. अभिवादनपर कार्यक्रमाचे संचलन प्रा.कन्नाके सर तर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक मान.एच.आर. कस्तुरे सर आणि आभारप्रदर्शन पर्यवेक्षक एम.डी.लाकडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक,अध्यापक,अध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.