शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची आमसभा काल दिनांक 29/12/2024 ला जीवक वाचनालय वरोरा येथे पार पडली.सभेचे अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय अरुणकुमार हर्षबोधी सर हे होते. सभेला केंद्रीय उपाध्यक्ष एम. जी. पाटील सर,कार्यवाह संजय बोधे सर, विभागीय अध्यक्ष हेमराज नंदेश्वर सर, श्रीराम मेंढे सर, श्रीरामे सर उपस्थित होते.
या सभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्या कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून रवींद्र मोटघरे सर यांची एकमताने निवड झाली. तसेच इतरही पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
तसेच या प्रसंगी वरोरा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हर्षबोधी सर, पाटील सर, बोधे सर, नंदेश्वर सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रितमदास सोनारकर सर यांनी ,सूत्रसंचालन मनोज वनकर सर यांनी तर आभार प्रदर्शन वशिष्ठ पेटकर सर यांनी केले. याप्रसंगी नवीन कार्यकारिणी चे सर्वांनी अभिनंदन केले.याठिकाणी अनेक समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.