शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरवात या दिवशी संपूर्ण जगात नववर्षाचा जल्लोष असतो.परंतु भारतातील आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शोर्याचा दिवस आहे.
या दिवशी पुण्याजवळील भिमा कोरेगांव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो भिम सैनिक जमा होतात.
या विजयस्तंभाला डॉ. आंबेडकरांनी १ जानेवारी रोजी मानवंदना देवून आपल्या संघर्षाची सुरुवात केली होती.
तेव्हापसून त्याच स्थळाला १ जानेवारी रोजी दरवर्षी आंबेडकरी जनता संघर्षशील बाण्याने गानवंदना देत असते.
या सुवर्णमयी इतिहासाच्या प्रेरणेने आंबेडकरी जनतेत चैतन्य निर्माण व्हावे.तरुणांना योग्य दिशा मिळावी व प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार व्हावे म्हणून सदर कार्यक्रम दि. १ जानेवारी २०२५ रोजी बुधवारला आयोजित केलेला आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
*****
कार्यक्रमाची रुपरेषा…
१ जानेवारी २०२५ बुधवार…
सकाळी ०९.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान,चिमुर येथे समता सैनिक दल,चिमुर यांच्या तर्फे मानवंदना…
१ जानेवारी २०२५ बुधवार…
सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान, चिमुर येथून बाइक रॅली व सर्व महापुरुषांना आदरांजली.
२ जानेवारी २०२५ गुरुवार…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान,चिमुर येथे रक्तदान शिबिर…
३ जानेवारी २०२५ शुक्रवार …
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभयंकर मैदान,चिमुर येथे आदरांजली…