सिरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन…

         रामदास ठुसे

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

            स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी २०२५ रोज शुक्रवारला १९४ वी जयंती सोहळा माळी समाज सिरपूरच्या वतीने आबाजी आदे यांचे पटांगण शिवनपायली रोड सिरपूर येथे सकाळी ११ वाजता आयोजीत केले आहे.

             यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माळी समाज महिला कार्यकर्त्या मेंडकीचे वंदनाताई शेंडे, प्रमुख अतिथी म्हणुन माळी समाज महिला कार्यकर्ती ब्रम्हपुरीच्या डॉ. पल्लवीताई मोहुले उपस्थित राहणार आहेत.

           तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील मंगेश भानारकर, सेवानिवृत्त पोलीस तथा अध्यक्ष तंटामुक्त समिती सिरपुरचे ईश्वर लेनगुरे, ग्रामपंचायत सदस्य जयपाल गावतुरे, सेवा सहकारी संस्था सिरपुरचे अध्यक्ष भुनेश्वर गावतुरे, उपाध्यक्ष विनोद निकोडे, माळी समाज सिरपुरचे अध्यक्ष जयपाल गुरनुले, प्रतिष्ठीत नागरिक डॉ. रामकृष्ण सोनुले, ग्रामपंचायत सिरपूरच्या सदस्या वैशाली निकोडे, अंगणवाडी सेविका कल्पना गावतूरे, माजी सरपंच पार्वता आदे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

         कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज सिरपूरचे सचिव विशाल गावतूरे, मनोज मोहुर्ले, देवराव गावतूरे, जयेंद्र गुरनुले, राजकुमार गावतूरे, हिमांशु सोनुले, दिवाकर गावतूरे, स्वराज निकोडे, सुनिल गावतूरे, अमोल मोहुर्ले, मंगेश निकोडे, यशवंत निकोडे, जीवन गावतूरे आदीने केले आहे.