मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा, त्यास नसे ठावा…

         ” हरीण मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते. तीचा वास साऱ्या वातावरणात पसरतो. त्या वासासाठी तो सैरावैरा धावत सुटतो…….!”

             परंतू , त्याला एवढे समजत नाही की तो वास माझ्याच कस्तुरीचा आहे म्हणून.

      अशी अवस्था आज आमच्या……

        भारतीय जनतेची झाली आहे…..!

                          कारण

           एका इंग्रज अधिकाऱ्याने ब्रिटिश साम्राज्याच्या काळात विनोदात एक कटूसत्य सांगितलं होतं……..

       “की, जर कधी सर्व भारतीय मिळून एके ठिकाणी जर येऊन थुकले……

         तर त्या महापुरात आम्ही सर्व ( इंग्रज ) वाहून जाऊ……..!

      ते सुद्धा करू शकत नाही हा त्यांचा आत्मविश्वास.

            हीच मिजास येथील मनुवाद्याची झालेली असल्यामुळे आम्ही बहुजन, ओबीसी, दलित, मुस्लिम एकत्र येऊ शकत नाही, किंवा तसे एकत्र येऊ न देण्यासाठीच जाती / धर्माचे कोरड्या अहंकाराचे पीक जोमात आणण्यासाठी, लोकशाहीच्या नावावर येथील मनुवादी व्यवस्था सर्वतोपारी प्रयत्न करत आलेली, करत आहे, करत राहील…….!

            म्हणून आम्ही या RSS / भाजप / मोदी -शहा / एक खुनी दुसरा तडीपार यांचे गुलाम झालो आहोत……..!

            कारण या व्यवस्थेने तर आता या कस्तुरीचा वास 2025 च्या काळात कायमचे बंद करण्यासाठी बेंबीच कापून टाकलेली आहे.

              त्यामुळे महापुरुषांच्या क्रांत्या, त्यांच्या स्मारकात बंदिस्त करुन टाकण्यासाठीच त्या स्मारकांना वाट्टेल तेवढा निधी देऊन या गुलामांना अंधभक्त बनविण्याची व्यवस्था या व्यवस्थेने व्यवस्थितपणे केलेली आहे……!

          वाचनालयांना एक तर परवानगी नाही, असेल तर त्यात अशी पुस्तके असतील जे तुम्हाला व्यवस्थेचेच गुलाम बनवण्यास भाग पाडतील. त्यातून अणुबॉम्ब टाकणारे लेखकांची पुस्तके हद्दपार होतील.

              अशा अवस्थेत आम्ही भारतीय जनता या साडेतीन टक्क्याच्या मनुवाद्याचे गुलाम म्हणून उद्याच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या त्यांच्या शताब्दी महोत्सवाचे नटून, थटून सौभाग्यवती बनून औक्षण करणार………..

                        का…….

               आत्मविश्वासाच्या बाह्या वर करुन या व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानाचे पाणि पाजून यांना चारी मुंड्या चीत करणार……!

                 मी तर करणार……!

                   तुम्ही……….?

आवाहनकर्ता,जागृतीचा कृतिशील लेखक

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689