विराट जनसमुदाय आज नागपूरच्या पवित्र दिक्षाभूमीवर तथागत भगवान बुध्दांसह,महामानवास भावपूर्ण विनम्र अभिवादन करणार! — धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे भारतातील जगविख्यात महा वैचारिक क्रांती,तद्वतच मानुस घडविण्याचे सर्वोत्तम ठिकाण..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

              भारत देशातंर्गत वंचित-शोषीत-पिडीत-समस्याग्रत-अधिकरविहिन-अत्याचारग्रस्त-शिक्षणाची सदैव दारे बंद असलेल्या  ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या जातीजमाती-विशेष मागासवर्गीय समाजातील सर्व नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगप्रसिद्ध इतिहासिक संघर्ष केला व वर्णव्यवस्थेच्या जुल्मी राजवटतीतून बहुजन समाजाला बाहेर काढीत त्यांना संविधानाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आवश्यक हक्क बहाल केले.

           तद्वतच या देशातील नागरिकांत मानसन्मानाचे जिवन जगण्याची नवीन उमीद जागवीणाऱ्या आणि योग्य वैचारिक दिशाकडे वळवीत तुम्हीही मानस आहात याची जाणीव करून देणाऱ्या युगपुरुष-युगपर्वतक,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ ला,”तथागत भगवान गौतम बुद्ध,त्यांचा सुविख्यात धम्म व सुशासन संघ यांना त्रिवार वंदन करुन,”लाखो जनसमुदायाच्या उपस्थित बौद्ध धम्माच्या तत्वप्रणाली नुसार,”बौद्ध धम्माची दिक्षा, नागपूरच्या पवित्र भुमीत भदन्त चंद्रमणी याचे द्वारा घेतली व जगविख्यात धम्मचक्र जगात परत एकदा गतीमान केले.

             यानंतर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या चारित्र्य संपन्न,न्यायसंगत,समतामूलक,बंधुत्व जोपासणाऱ्या व स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या धम्म विचारांचे धम्मचक्र गतीमान करीत उपस्थित ५ लाख नागरिकांना डॉ‌.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दिक्षा दिली व २२ प्रतिज्ञा दिल्यात.

             आजच्या स्थितीत भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले व महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने जगाच्या पटलावर आले व तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्म वैचारिक परिवर्तनाने जगप्रसिद्ध असे ऐतिहासिक शहर झाले.

            नागपूरची दिक्षा भूमी म्हणजे चारित्र्य संपन्न ज्ञानसागराचे महंतम ठिकाण,,बौध्द धम्माच्या उत्क्रांतीचे वैचारिक श्रध्दा स्थान,,प्रत्येक मनुष्याला मानुसपणाची जाणिव करुन देणारे वैचारिक उर्जा स्थान,,वर्णव्यवस्थेच्या जुल्मी नरकातून बाहेर काढणारे सर्वोत्तम दिशा स्थान,,देशातील मानसामानसात समानते अंतर्गत बंधुत्वाची संकल्पना रुजविणारे ऐतिहासिक प्रेरणा स्थान,,स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आबाधित ठेवणारे स्मरण स्थान,,अन्याय-अत्याचारा विरोधात सातत्याने लढाई लढण्यास वैचारिक ताकद देणारे संरक्षण स्थान…आहे….

            म्हणूनच विजयादशमी दिनाच्या म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील जगप्रसिद्ध दिक्षा भुमीवर देशविदेशातील ५० लाखांच्या वर अनुयायी मनस्वी श्रध्देंनी दरवर्षी येतात.

        आजही नागपूरच्या दिक्षा भुमीवर देशविदेशातील नागरिकांची अफाट गर्दी आहे.म्हणूनच आज नागपूरच्या पवित्र दिक्षाभूमीला विराट जनसमुदाय नमन करणार,तद्वतच तथागत भगवान गौतम बुध्दांना आणि महामान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण विनम्र अभिवादन!…

“तथागत भगवान बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना,धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने,” दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक,मुख्य कार्यकारी संपादक,संपादक,वृत्त संपादक,कार्यकारी संपादक,उपसंपादक,विभागीय प्रतिनिधी,जिल्हा प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,शहर प्रतिनिधी,ग्रामीण प्रतिनिधी,”यांचे द्वारा,”विनम्रपणे अभिनंदन!…