रोहन आदेवार

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा

 

मारेगाव: भिमा कोरेगाव शौर्यदिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मारेगाव येथे येत्या २ जानेवारी (सोमवार )ला राष्ट्रीय प्रबोधनकार , वादळवारा कॅसेट फेम, विद्रोही व क्रांतिकारक गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मारेगाव तालुक्यात सामाजिक चळवळीला ऊर्जा मिळावी आणि भिमा कोरेगाव शहीद हुतात्म्यांच्या बलिदानाची शौर्यगाथा समाजमनात कायम तेवत रहावी , त्यांच्या आहुत्यांना उजाळा देण्यासाठी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहे.

स्थानिक राज्यमहामार्गचे बाजूला , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटांगणात सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर भूषविणार आहे.

तालुक्यातील तमाम जनतेंनी वैचारिक मेजवानीची पर्वणी असलेल्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव फुले- शाहू- आंबेडकर प्रबोधन विचार मंच तथा मारेगाव , वणी – झरी तालूका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News