ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :—- पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून संरक्षणाची धुरा सांभाळणारे होमगार्ड सैनिक हे एक संरक्षणाची फळी असून नेहमी देशासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे सैनिक करीत असतात त्यामुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याची खरे कार्य हे गृहरक्षक दल करतात यांचे हे कार्य निस्वार्थी भावनेने असल्यामुळे ही संघटना कौतुकास्पद पात्र असल्याचे प्रतिपादन किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी केले ते दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या अंतर्गत पुरुष होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला विशेष अतीथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे ,सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अमिष निमजे ,वडसाचे प्रभारी अधिकारी शास्त्रकार ,केंद्रनायक प्रमोद रामेरवार आरमोरी चे प्रभारी अधिकारी अनिल सोमनकार ,सामुग्री प्रबंधक सुभेदार रवींद्र शहारे आदी मंडळी यावेळी उपस्थित होते दिनांक 22 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या पुरुष होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच 70 होमगार्ड जवानांची आरोग्य तपासणी त्यामध्ये रक्तगट चेक करणे बीपी शुगर आणि इतरही आरोग्याची तपासणी करण्यात आली या प्रशिक्षणा दरम्यान रायफल च्या माध्यमातून सलामीचे प्रशिक्षण देण्यात आले आणि रायफल विषयीची जानकारी सुद्धा गृहरक्षक दलाच्या जवानांना देण्यात आले सोबतच प्रशिक्षणाचे धडे देताना लाठी चा वापर लाठीचे नाव आणि लाट्टी हाताळण्याची पद्धत याविषयी सुद्धा सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, प्रथमोपचार म्हणजे काय विमोचन म्हणजे काय आगीवर नियंत्रण कसे ठेवायचे किंवा जखमा झाल्यास कशा त्या बांधायच्या इत्यादी विषयीचे प्रशिक्षण हे सुद्धा या गृहरक्षक दलाच्या जवानांना देण्यात आले, आणीबाणीच्या काळात गृहरक्षक दलाच्या सैनिकांनी कशा पद्धतीने वागायचे कायदा व सुव्यवस्था हाताळत असताना होमगार्डचे कर्तव्य अधिकार आणि जबाबदाऱ्या याविषयी सुद्धा मार्गदर्शन प्रशिक्षणाच्या दरम्यान करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक म्हणाले पोलिसांसोबत बंदोबस्त करण्यासाठी होमगार्ड सैनिकांची तयारी नेहमीच असते आणि कायदा व सुव्यवस्थेचे कार्य योग्य प्रकारे केले जाते परंतु या सैनिकांना योग्य प्रकारचा मोबदला मिळत नाही तो कमी प्रमाणात मिळतो त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर या सैनिकांमध्ये असतो याविषयीचे पाठपुरा वेळोवेळी शासनाकडे सुरू आहे. पोलिसांना या संघटनेच्या माध्यमातून बळ मिळत असते, प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमिषजी निमजे म्हणाले संपूर्ण देशभर अर्धसैनिक बल म्हणून प्रसिद्ध असलेली ही होमगार्ड संघटना असून यांच्या माध्यमातून संरक्षणाचे कार्य उत्कृष्टरित्या पार पडत असते उजळणी प्रशिक्षणाच्या दरम्यान यांना जेव्हा जागेची गरज भासल्या किंवा राजीव भवनांची गरज वाटल्यास आमच्याकडे जेव्हा जेव्हा उपलब्ध राहील त्यावेळेस आम्ही देणार अशी ग्वाही त्यांनी दिली सदर समारोपिय कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व पाहुण्यांना परेड कमांडर रवींद्र शहारे यांच्या नेतृत्वात परेड संचालन करण्यात आले. सोबतच या कार्यक्रमाप्रसंगी परेडचे प्लाटून क्रमांक एक चे नेतृत्व संजय बोरसरे वरिष्ठ फलटण नायक यांनी केले तर प्लाटून क्रमांक दोन हे नेतृत्व आरमोरी येथील पलटण नायक सुरेश सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रनायक प्रमोद रामेरवार यांनी केले संचालन दौलत धोटे यांनी केले तर आभार फलटणनायक सुरेश सोनटक्के यांनी मानले सदर प्रशिक्षण मध्ये एकूण 70 पुरुष होमगार्ड सैनिकांनी सहभाग घेतला समारोपिय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरमोरी पथकातील महिला होमगार्ड फलटण नायक बेबी मुंडरे कार्यालयाचे अंशकालीन शिपाई मोरेश्वर मेश्राम होमगार्ड सैनिक बाळू शेंडे सोनटक्के ठाकरे आणि इतरही होमगार्ड सैनिकांनी सहकार्य केले.