कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 

पारशिवनी :दिंनाक ३१/१२/२०२२

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भस्तरीय वधू. वर परिचय समाज मेळाव्याचे आयोजन नागपूर येथे दिनांक 9 जानेवारी 2023 ला कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आव्हान गोपाल कडू सरचिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भस्तरीय वधू. वर परिचय समाज मेळाव्याचे आयोजन नागपूर येथे दिनांक 9 जानेवारी 2023 ला कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात विवाह इछ्युक युवक यूवतीचा स्नेहबंध परिचय मेळावा व विविध क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त समाज बांधवाचा गौरव करण्यात येणार आहे. व नाभिक समाजातील विविध कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व सामाजिक दायित्व स्विकारूण समाज हित जोपासण्यासाठी कार्य करणाऱ्या मान्यवराचा समाजगौरव व समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी मेळाव्यात विदर्भ. मराठवाडा. उत्तर महाराष्ट्रातील. पश्चिम महाराष्ट्रातील. कोकण. विभागातून व मध्यप्रदेश. छत्तीसगड. कर्नाटक. इत्यादी राज्यातील विवाहेच्छूक युवक व युवती उपस्थित राहणार असून स्नेहबंध स्मरणिकेत प्रशिध्द करण्यात येणार आहे. असी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस गोपाल कडू यांनी सांगितले.

याप्रसंगी श्याम आस्करकर. अंबादास पाटील. बंन्डू राऊत. प्रभाकर फुलबांधे. सौ. हिराबाई बोरकर. राजूभाऊ चिंचोळकर. सह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

नाभिक समाज हा अल्पसंख्याक असुन समाज कल्याण व सामाजिक दायित्व. एकता. व तळागाळातील समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी प्रखरपणे लढा देण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्धार असून समाज बांधवांनी सदर मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आव्हान गोपाल कडू सरचिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com