दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र अलंकापुरी अर्थात आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी कैलास केंद्रे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे तर, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना मुख्याधिकारी, आळंदी नगरपरीषद या सध्याच्या पदावरून दि.२९ डिसेंबर २०२२ (म.न.) पासून कार्यमुक्त करण्यात येत असून, त्यांच्या नव नियुक्तीचे आदेश स्वतंत्र पणे निर्गमित करण्यात येतील.
नवनिर्वाचित मुख्याधिकारी कैलास केंद्रे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषद येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. केंद्रे यांना मुख्याधिकारी सांगोला नगरपरीषद या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे, केंद्रे यांना दिलेल्या आदेशानुसार दि. ३० डिसेंबर रोजी मुख्याधिकारी,आळंदी नगरपरीषद पदावर रुजू व्हावे तसा अनुपालन अहवाल शासनास तत्काळ सादर करावा असे शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी सांगितले आहे.
नवनिर्वाचित मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या पुढे आळंदी शहराला नियमित पाणीपुरवठा कसा सुरू होईल तसेच येणाऱ्या भाविक भक्तांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आवाहन असणार आहे.